आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

सोमाटणे फाटा येथील सुप्रसिद्ध पवना हॉस्पिटलचा 26 वा फाउंडेशन डे अत्यंत दिमाखात साजरा..

Spread the love

सोमाटणे फाटा येथील सुप्रसिद्ध पवना हॉस्पिटलचा 26 वा फाउंडेशन डे अत्यंत दिमाखात साजरा..The 26th Foundation Day of the famous Pavana Hospital in Somatne Phata was celebrated with great pomp..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २४ मार्च.

मावळ परिसरातील रुग्णांची सेवा ही– रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या भूमिकेतून ह अहोरात्र गेले पंचवीस वर्ष कार्यरत असणाऱ्या पवन हॉस्पिटलच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त एक अतिशय देखणा आणि हृदयस्पर्शी असा समारंभ आयोजित करण्यात आला होता.

त्यानिमित्ताने हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाच्या विविध क्षेत्रात सर्वोत्तम सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा- कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला! त्याचबरोबर डी एन बी या संस्थेकडून पदव्युत्तर शैक्षणिक कोर्सेसना मान्यता देण्यात आल्याचे प्रमाणपत्रही स्वीकारण्याचा समारंभही करण्यात आला.

या अत्यंत देखण्या समारंभाचे अध्यक्ष होते तळेगाव दाभाडे येथील ज्येष्ठ डॉक्टर शाळीग्राम भंडारी आणि प्रमुख अतिथी म्हणून पुण्याचे सुप्रसिद्ध सर्जन बोकील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी याही समारंभास उपस्थित होत्या! डॉक्टर सत्यजित वाढोवकर सरांनी सर्वांचं स्वागत आणि प्रास्ताविक केलं त्यात त्यांनी सर्व रुग्णांचे आपल्या मातापित्यांचे आणि विशेष करून त्यांची पत्नी. डॉक्टर वर्षा मॅडम या सर्वांविषयी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली! डॉक्टर बोकील सरांनीही समारंभास आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

पवना हॉस्पिटलच्या विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य संपादन करणाऱ्या कर्मचारी डॉक्टर नर्सेस यांचा सन्मान करण्यात आला! समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर शालिग्राम भंडारी यांनी वैद्यकीय क्षेत्रात गेले पंचवीस वर्ष सतत यशस्वीपणे रुग्णसेवा देणाऱ्या पवना हॉस्पिटलच्या सर्वांचं मनःपूर्वक मनापासून कौतुक केलं!अभिनंदन केलं! सोमाटणे फाटा येथील एक छोट्याशा क्लिनिकचं रूपांतर जवळजवळ 200 बेडच्या अत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये रूपांतर होईपर्यंतच्या प्रवासाचा मी साक्षी आहे-याचा मला सार्थ अभिमान वाटतो असं त्यांनी पुढे आपल्या मनोगतात व्यक्त केलं.

डॉक्टर सत्यजित दादा यांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र रुग्णसेवेत मग्न असणाऱ्या डॉक्टर वर्षा यांनी आपल्या पवना हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाचा आढावा आपल्या भाषणात घेतला! त्यानंतर त्यांनी आपल्या परिवारातर्फे सर्वांचे मनःपूर्वक आभार मानलेत! सुग्रास भोजनाने या समारंभाची सांगता झाली! समारंभाच्या सभागृहातून बाहेर पडताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान आणि आनंद विलसत होता! यातच या समारंभाची यशस्विता दिसून येत होती!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!