आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता

ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांची आख्यायिका विशद करणारे ‘गावचा काळभैरवनाथ झाला डोळसनाथ’ गीत प्रदर्शित…

Spread the love

ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांची आख्यायिका विशद करणारे ‘गावचा काळभैरवनाथ झाला डोळसनाथ’ गीत प्रदर्शित…The song ‘Gaoncha Kalbhairavnath Jhala Dolasnath’, which describes the legend of the village deity Shri Dolasnath Maharaj, was released…

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे वार्ताहर ,२३ मार्च.

 

तळेगाव दाभाडे: शहराचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या उत्सवाचे औचित्य साधत डोळसनाथ महाराजांचा महिमा सांगणारे गीत प्रदर्शित करण्यात आले आहे. गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या या उत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रदर्शित करण्यात आलेल्या या गीतात मंदिराची उभारणी, जिर्णोद्धार यासह भैरवनाथाचे नाव डोळसनाथ म्हणून प्रचलित कसे झाले, याविषयी प्रचलित असलेली अख्यायिका विषद करण्यात आली आहे.

श्री डोळसनाथ महाराजांवर गायलेले प्रदर्शित करण्यात आलेले पहिलेच गीत आहे. गायक चंदन कांबळे यांनी हे गीत गायले असून सहकलाकार गोरक्षनाथ जाधव यांनी साथ दिली आहे. गाण्याचे गीतकार/संगीतकार असून संगीत दिग्दर्शक विनायक कुडाळकर आहेत. तर या गीताचे संगीत संयोजन अक्षय म्हाप्रळकर यांचे आहे.

“गावाचा काळभैरवनाथ झाला डोळसनाथ” या गीताची निर्मिती पुणे महानगर नियोजन समिती सदस्य तथा तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक संतोष मारूती भेगडे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!