आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

डायमंड जैन सोशल ग्रुप पिंपरी चिंचवडच्या अध्यक्ष पदी प्रशांत गांधी तर; फर्स्ट लेडी पदी डॉ. क्षितिजा गांधी यांची निवड.

जैन सोशल ग्रुप पिंपरी चिंचवडने आपल्या गतवर्षीचा मागोवा घेत सन २०२३-२४ चा पदग्रहण सोहळा बालेवाडी स्टेडियममध्ये मोठ्या उत्साहात स्पोर्ट्स या संकल्पनेने साजरा केला.

Spread the love

डायमंड जैन सोशल ग्रुप पिंपरी चिंचवडच्या अध्यक्ष पदी प्रशांत गांधी तर; फर्स्ट लेडी पदी डॉ. क्षितिजा गांधी यांची निवड.Prashant Gandhi as President of Diamond Jain Social Group Pimpri Chinchwad; As First Lady Dr. Selection of Kshitija Gandhi.

आवाज न्यूज : चिंचवड  प्रतिनिधी, २५ मार्च.

जैन सोशल ग्रुप पिंपरी चिंचवडने आपल्या गतवर्षीचा मागोवा घेत सन २०२३-२४ चा पदग्रहण सोहळा बालेवाडी स्टेडियममध्ये मोठ्या उत्साहात स्पोर्ट्स या संकल्पनेने साजरा केला.

 

वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी खजिनदार धवल पटेल यांनी संपूर्ण वर्षाचा लेखा-जोखा अत्यंत कमी पण समर्पक शब्दात मांडला. कमलेश चोपडा यांनी आपल्या दोन वर्षातील सर्व कार्यक्रमाची झलक आपल्या खुसखुशीत शैलीत तर फर्स्ट लेडीने अत्यंत काव्यात्मकरित्या आपला अनुभव कथन केला. अध्यक्ष व सभासदानी आपले मनोगत व्यक्त केले. पूर्वाध्यक्ष अतुल धोका यांनी, प्रशांत गांधी व फर्स्ट लेडी डॉ. क्षितिजा गांधी नविन अध्यक्ष म्हणून जाहीर केले.

 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रतिभा ग्रुप ऑफ इंस्टिट्यूटचे संस्थापक सचिव, यशस्वी उद्योजक, समाजिक आणि धार्मिक कार्यात भरीव कार्य असणारे लायन डॉ. दीपक शाह, पदग्रहण अधिकारी लालचंद जैन, इंटरनॅशनल डायरेक्टर, बीरेन् शाह, झोन कोआर्डिनेटर युवराज शाह, जेअसजीयन मनेश शाह, उन्मेष कर्णावत, दिलीप मेहता, हसमुख जैन, दिलीप चोरबोले, चंचला कुचेरिया, राजेंद्र धोका हे सपत्नीक उपस्थित होते.

सर्व माजी अध्यक्षाकडून मशाल एकमेकांकडे हस्तांतर करून ती नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत गांधी यांच्याकडे जणू प्रतिकात्मकरित्या हे कार्य पुढे चालू ठेवावे हा संदेश देत सुपूर्त करण्यात आली.प्रत्येक कमिटी कार्यकर्ताने खेलो इंडिया खेलो च्या धर्तीवर एकेका राज्याचे प्रतिनिधित्व अत्यंत सुंदर सादरीकरण करीत आपापल्या टीमसहित प्रवेश केला. उपाध्यक्ष म्हणून कमलेश चोपडा, सचिव म्हणून धवल पटेल, खजिनदार पदी केतन शहा आणि उपसचिव पदी गिरीश कोठारी यांनी शपथ घेतली. या संपूर्ण कार्यक्रमात सर्व सभासदानी उत्साहने नवीन कमिटी सोबत शपथ ग्रहण केली.

या कार्यक्रमात एशियन योगा गोल्ड मेडल विजेती, अभिश्री गायकवाड़ आणि बुलाह यांनी तालबद्ध जिम्नॅस्टिक्स आणि म्युझिकवर विविध प्रकार उपस्थितांकडून खूप सुंदर पद्धतीने करून घेतले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धवल पटेल यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा जैन व कुमार तनिष्क गांधी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!