देश विदेशमहाराष्ट्र

सुरतमधील डी. खुशालभाई ज्वेलर्स ने राम मंदिराच्या चांदीच्या प्रतिकृती बनवल्या आहेत.

अयोध्या मधील मार्केट मध्ये या चांदीच्या प्रतिकृतीची तुफान चर्चा सुरु आहे.

Spread the love

सुरतमधील डी. खुशालभाई ज्वेलर्स ने राम मंदिराच्या चांदीच्या प्रतिकृती बनवल्या आहेत.D. in Surat. Khushalbhai Jewelers have made silver replicas of Ram Mandir.

आवाज न्यूज :  विशेष प्रतिनिधी, २५ मार्च.

 

खुशालभाई ज्वेलर्स चे मालक दीपक चोकसी यांनी सांगितलं की राम मंदिर भारतीय संस्कृतीचे एक प्रतीक आहे त्यामुळे आम्ही मंदिराच्या चांदीच्या प्रतिकृती बनवण्याचा विचार केला. सध्या अयोध्या मधील मार्केट मध्ये या चांदीच्या प्रतिकृतीची तुफान चर्चा सुरु आहे.

 

रामनवमी उत्सवाचे औचित्य साधून त्यांनी राम मंदिराच्या चांदीच्या वेगवेगळ्या आकारातील चार प्रतिकृती बनवल्या आहेत ज्या अत्यंत सुंदर असून त्यांनी अयोध्येतील मार्केट मध्ये खूप कौतुकाची लूट केली आहे. यातील सर्वात छोट्या चांदीच्या प्रतिकृती चे वजन सहाशे ग्रॅम असून सर्वात मोठ्या प्रतिकृतीचे वजन तब्बल पाच किलो आहे.

जेव्हापासून या मंदिरांच्या प्रतिकृतीची वार्ता अयोध्येमध्ये समजली तेव्हापासून भाविकांनी खूप मोठ्या संख्येत या मंदिरांच्या प्रतिकृतीची मागणी वाढत जातं आहे. आपल्या श्रीराम मंदिर बनून तयार झालेल्या वर्षाची आठवण आणि श्रीरामांप्रती असलेल्या प्रेमासाठी या प्रतिकृती आपल्या घरातील देव्हाऱ्यात ठेवण्यास अनेक लोकं उत्सुक आहेत.

अयोध्या  मंदिरांच्या प्रतिकृतीचा व्हिडिओ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!