आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

सांस्कृतिक पुण्याची उपेक्षा, पुण्यातील सांस्कृतिक क्षेत्र वंचित.

या अंदाजपत्रकात सांस्कृतिक उपक्रम किंवा सांस्कृतिक वातावरणाला चालना मिळेल असा काही ठोस विचार झाल्याचे दुर्देवाने दिसत नाही.

Spread the love

सांस्कृतिक पुण्याची उपेक्षा, पुण्यातील सांस्कृतिक क्षेत्र वंचित.Neglect of cultural Pune, the cultural sector of Pune is deprived.

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, २५ मार्च.

पुणे महापालिकेचे बजेट 9515 कोटीवर पोचल्यामुळे पुण्याचे आर्थिक सामर्थ्य वाढल्याचे दिसून येते आहे, याबद्दल महापालिका आयुक्तांचे मनापासून अभिनंदन. अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यात माझ्यासाठी काय, याचा प्रत्येक जण मागोवा घेत असतो. पुणे शहराची एक ओळख सांस्कृतिक नगरी अशीही आहे. प्रसारमाध्यमातून आलेल्या माहितीवरून या अंदाजपत्रकात सांस्कृतिक उपक्रम किंवा सांस्कृतिक वातावरणाला चालना मिळेल असा काही ठोस विचार झाल्याचे दुर्देवाने दिसत नाही.

 

पुण्यातील अनेक नाट्यगृहे आणि आर्ट गॅलरीजचे काम अर्धवट आणि अपूर्वा अवस्थेत आहे. ते मार्गी लावण्यासाठीचे प्राधान्य किंवा आग्रह या अर्थसंकल्पात दिसत नाही असे खेदाने नमूद करावेसे वाटते. प्रशासकीय राजवट असल्याने राजकीय दबाव तुलनेने कमी असतांना शहरातील सांस्कृतिक उपक्रमास गती देतां येईल, असे ठोस धोरण व्यक्त झाले असते तर पुणेकरांना ते निश्चित आवडले असते. परंतु आयुक्तांनी ही संधी घालवली आहे, अशी आमची प्रामाणिक भावना आहे.

 

परदेशात शहराच्या लौकिकात भर टाकतांना पायाभूत सुविधांबरोबरच शहराचे सांस्कृतिक. आणि वारसा वैभव जपण्यावर भर दिला जातो. शहराची मुळ ओळख पोचवण्यासाठी भर दिला जातो. दुर्देवाने या अर्थसंकल्पात सांस्कृतिक क्षेत्राचा विचार झालेला नाही किंवा झालेला असेल तर तो पुरेसा नाही हे नक्की असे वक्तव्य चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश अध्यक्ष.बाबासाहेब पाटील, यांनी आवाज न्यूजला माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!