आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

शिलाटणे मधील शिवभक्त करण कोँडभर या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू .

Spread the love

शिलाटणे मधील शिवभक्त कै. करण कोँडभर या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू .Shivbhakt Kai in Shilatne. Karan Koandbhar died during treatment.

आवाज न्यूज : लोणावळा ता.२५(प्रतिनिधी ).

शिवज्योत आणण्यासाठी मल्हारगडावरून परतणारा व अपघातात गंभीर जखमी झालेला , मृत्यूंशी आठ दिवस झुंज देणारा शिवभक्त कै.करण शञुघ्न कोंडभर (वय-२२) याचा ता.१७ रोजी खाजगी रूग्णलयात मृत्यू झाला. त्याचे पार्थिवास तळेगाव येथे उत्तरीय तपासणीनंतर शिलाटणे येथे नातेवाईकांच्या ताब्यात दिले. शेकडो नातेवाईक व ग्रामस्थांचे उपस्थितीत त्याचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंचक्रोशित या दुर्घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
कै.करण कोंडभर हा महिंद्रा कंपनीत काही महिने काम करीत होता.

ता.१० रोजी शिवज्योत घेवून परतणारे सुमारे ४५ ते पन्नास मावळे टेंपोत असताना व काही मोटारसायकलवर शिवज्योती बरोबर पुढे चालले आसताना ;पाठीमागून कंटेनर ने जोराने धडक देऊन अपघात केल्याने त्यात तेहतीस मावळे गंभीर व काही किरकोळ जखमी झाले होते.
काही रावेत येथील तर काही सोमाटणेफाटा येथे उपचार घेत होते.

त्यातील रावेत येथील लहानशा बाल मावळ्याचा कु.आर्यन सोमनाथ कोंडभर (वय-१२), याचा ता.१६ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमीमधे काहींच्या प्रकृतीत स्थिरस्थावर होत असताना काहींच्या जखमेवर शस्ञक्रिया करण्यात आल्या . कै.करण याची तब्येत सुधारत असताना ,
सोमाटणेफाटा येथील पवना हाॕस्पिटलमधे शस्ञक्रिया झालेल्या .करण शञुघ्न कोँडभर (वय-२०) याचे पोटास गंभीर मुक्का मार होता. टेम्पोमधे झोपलेला असताना आपघात झाल्याने त्याचे कीडनी व पोटाला मुक्का मार लागल्याने आतड्यास व पानथरीस गंभीर जखम झाली होती.

या अपघातास कारणीभूत कंटेनर चालकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा , अशी नातेवाईक यांनी मागणी केली आहे. आई , वडील , बहिणी , आणि नातेवाईकांच्या दुःखास पारावार राहिला नाही.
या अपघातामधील काही तरूण शिवभक्त खासगी रूग्णालयात आद्यापही उपचार घेत आहे. त्यात कै.करणचा भाऊ आणि गावातील पंधरा वीस तरूण , व बालमावळे यांचा समावेश आहे.

कै.करण शञुघ्न कोँडभर याचे पश्चात आई , वडील,एक भाऊ,तीन विवाहीत बहिणी , आजोबा , चुलते , चुलत भाऊ , आत्या , असा मोठा परिवार आहे.
शिलाटणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच भरत कोँडभर हे त्यांचे चुलते होत. तसेच पाटण येथील प्रसिध्द भजनगायक नारायण रमाजी तिकोणे हे त्याचे आजोबा होत.
ता. १६ रोजी मरण पावलेला कै.आर्यन सोमनाथ कोँडभर याचे पश्चात आई , वडील , दोन चुलते , आजोबा , आजी असा परिवार आहे. तो माजी सरपंच सुकेशिनी कोँडभर यांच्या धाकट्या दीराचा मुलगा होता.

शिवज्योत आणताना आपघातात मरण पावलेल्या तरूण मावळे यांना शहीद असा दर्जा द्यावा,शिवछञपतींची जयंती साजरी करण्यासाठी शिवज्योत आणण्यासाठी शिवरायांचे गडकिल्ले येथे गेलेल्या व अपघातात मृत्यू झालेल्या मावळ्यांना शहीदाचा दर्जा राज्य व केँद्र शासनाने द्यावा. तसेच या मावळ्यांचे पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावे.तसेच पीडीत कुटूंबातील वारसांना प्रत्येकी पंचवीस लाखांची तातडीने मदत द्यावी , जखमींना तातडीने राज्य व केँद्राचे सरकारने प्रत्येकी दहा लाखांची मदत द्यावी , अशी ग्रामस्थ व नातेवाईकांच्यावतीने करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!