आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्रसामाजिक

श्रीराम नवमी निमित्ताने गवळीवाडा , भांगरवाडी , कुसगाववाडी येथे श्रीरामजन्म सोहळा संपन्न..

श्रीराम नवमी निमित्ताने गवळीवाडा , भांगरवाडी , कुसगाववाडी येथे श्रीरामजन्म सोहळा उत्साहात संपन्न झाला.

Spread the love

श्रीराम नवमी निमित्ताने गवळीवाडा , भांगरवाडी , कुसगाववाडी येथे श्रीरामजन्म सोहळा संपन्न..On the occasion of Shree Ram Navami, Shree Ramjanam celebrations were held in Gawliwada, Bhangarwadi, Kusgaonwadi.

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी २ मार्च .

श्रीराम नवमी निमित्ताने गवळीवाडा , भांगरवाडी , कुसगाववाडी येथे श्रीरामजन्म सोहळा उत्साहात संपन्न झाला.गवळीवाडा येथे गुढीपाडव्यापासून पहाटे ५ ते ६ श्रीरामरक्षास्तोञपठन झाले.ता.२९ रोजी सायंकाळी गायनाचार्य म्हाञेबुवा यांचे सायंकाळी ७ ते ९ चक्रीभजन झाले. सकाळी ९ वाजता होमहवन झाले.
ता.३० रोजी सकाळी देवाचा आभिषेक झाला. दुपारी ११ ते १२ .३० पर्यत संगीत चक्री भजनाचा कार्यक्रम झाला. साडेबारा वाजता पुरोहीत श्री पिंगळे तात्या यांनी श्रीरामजन्म आख्यानाचे आध्यायाचे वाचन केले.

यावेळी श्रीरामजन्माचा पाळणा झाला.आरती झाली.यावेळी माजी नगरसेवक दिलीप लोंढे , निखिल कविश्वर , माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर , तसेच सुधीर शिर्के , माजी नगराध्यक्षा सौ.रेखाताई जोशी , माजी उपनगराध्यक्षा सुवर्णाताई आकोलकर , माजी नगरसेविका सिंधुताई कविश्वर , तसेच श्रीराम मंडळाचे कार्यकर्ते , पदाधिकारी , महिला कार्यकर्त्या उपस्थित होते. यावेळी सुगंधी दूध वाटप करण्यात आले. यावेळी उद्योजक अतुल जोशी , पोलिस निरिक्षक सिताराम डुबल , तसेच आनेक मान्यवर उपस्थित होते. भजनप्रेमींसाठी पुरणपोळी चा प्रसाद ठेवण्यात आला होता.
ता.३१ रोजी कुस्त्यांचा जंगी आखाडा व राञी श्रीच्या पालखीची भाव्य मिरवणूक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
यावेळी श्रीराम जन्मसोहळ्यास सहकार महर्षी , पीडीसीसी बँक संचालक माऊली दाभाडे , तसेच उद्योजक रमेशचंद्रजी व्यास , तसेच भजनगायक , मृदूंगमणी , भाविकांकडून दर्शनासाठी गर्दी केली होती.

भांगरवाडी येथे श्रीराम मंदिरात यावर्षी श्रीरामजन्म सोहळा , पाळणागायन व आरती झाली.यावेळी देवस्थानचे विश्वस्थ अॕंड .माधवराव भोंडे , विश्वस्थ सौ.राधिका भोंडे , पुजारी किरीट जोशी , आदी उपस्थित होते.यावेळी मावळचे आमदार सुनिलआण्णा शेळके यांचेकडून श्रीरामाचे दर्शन घेण्यात आले..त्यांनी मंदिराचे नूतनीकरणाचे कामाचे कौतुक केले.तसेच काही मंदिराचे जिर्णोदारासाठी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी धनंजय काळोखे , आविनाश ढमढेरे , राष्ट्र्वादीचे शहराध्यक्ष विलासभाऊ बडेकर , कार्यकर्ते मनिष पटेकर , सागर तावरे , तसेच आनेक मान्यवर उपस्थित होते.

कुसगाववाडी येथे श्रीराममंदिरामधे आधल्या दिवशी महिलांचे करीता ज्युनिअर मकरंद आनासपुरे , महादेव वाघमारे यांचा खेळ रंगला पैठणीचा , होम मिनिस्टर कार्यक्रम झाला..ता.३० रोजी सकाळी ११ ते १२ श्रीराम जन्माचा सोहळा व पाळणा , सुंटवडा वाटप झाला. श्रीरामाचे प्रतिमेची डी जेच्या तालावर भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली.
हिंदू समितीतर्फे भांगरवाडी येथील श्रीराम मंदिर ते गौळीवाडा श्रीराम मंदिरापर्यत श्रीराम व छञपती शिवाजीमहाराज यांची भव्य मोटारसायकल रॕली काढण्यात आली होती.सुमारे बारा ते दोन रॕली झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!