अध्यात्मिकआपला जिल्हादेश विदेशमहाराष्ट्र

आई श्रीएकविरा देवीची चैञी याञा उत्साहात संपन्न .

वेहेरगावच्या डोंगरावरील कार्लाच्या आई श्रीएकविरा देवीची चैञी याञा गुढीपाडव्यापासून सुरू झाली.आणि सप्तमी , आष्टमी , नवमी होम हवन कार्यक्रमानंतर उत्साहात संपन्न झाली.

Spread the love

आई श्रीएकविरा देवीची चैञी याञा उत्साहात संपन्न .Mother Sri Ekvira Devi’s energy is full of enthusiasm.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी २ एप्रिल.

 

आगरी , कोळी , सी के पी , सोनार तसेच हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे , राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे व मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे कुळदैवत असणारी श्रीएकविरा देवी ची याञा उत्साहात संपन्न झाली.वेहेरगावच्या डोंगरावरील कार्लाच्या आई श्रीएकविरा देवीची चैञी याञा गुढीपाडव्यापासून सुरू झाली.आणि सप्तमी , आष्टमी , नवमी होम हवन कार्यक्रमानंतर उत्साहात संपन्न झाली.

सुमारे दोन ते आडीच लाख भाविकांकडून यावेळी दर्शनाचा लाभ घेण्यात आला.मंदिरावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली होती. संपूर्ण मंदिराला दर्शनी भागावर आईचा स्वर्ग व नगारा इमारतीवर तसेच दर्शनरांगेच्या परिसरावर अशा अक्षरांची फुलांनी सजावट केली होती..विद्युतरोषणाई केल्याने , जागोजागी हॕलोजन दिवे , रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा यामुळै गडावर स्वर्ग आवतरलेला पहायला मिळाला.

सप्तमीला आई श्रीएकविरा देवीचा भाऊ श्री काळभैरवनाथाची पालखी मिरवणूक ढोलताशांच्या तालात देवघर येथे काढण्यात आली.विश्वस्थांतर्फे व देवघर ग्रामस्थांतर्फे पालखीतून देवाची व श्री जोगेश्वरी मातेची गुलालाचा वापर करीत ढोलताशांचा दणदणाटात मिरवणूक काढण्यात आली.कोळी , आगरी , ठाणे , कोळीवाडा , तसेच कोकणदिंड्या , पालख्या यावेळी येथे आल्या होत्या .
आष्ठमीला कार्लाच्या श्रीएकविरा देवीची पालखी मंगळवारी सायंकाळी सहाचे सुमारास गडावर प्रदक्षिणा साठी निघाली .
गडावरच चेऊलचे आग्रावकर व ठाण्याचे वासकर , तसेच देवस्थानचे नवनिर्वाचित विश्वस्थ यांचे उपस्थितीत पालखी मधे सोन्याचा आई श्रीएकविरा चा मुगूट ठेवण्यात आला..आयो आयलोय ! ! आईचा उदो , , ! ! ऊदो ! ! ! अशा घोषणा देत पालखी गडावर मिरवणूकीसाठी निघाली .पहाटेपासूनच पालखीचे मिरवणुकीची तयारी सुरू होती.

पहाटे देवीचा आभिषेक व पूजा झाल्यानंतर आरती झाली..त्यानंतर दर्शनासाठी रांगेने दर्शनास मंदीर खुले करण्यात आले. तहसिलदार मधुसुदन बर्गे , कार्लाचे मंडलाधिकारी माणिक साबळे , तलाठी मीरा बोराडे , आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी देवस्थानचे विश्वस्थ नवनाथ देशमुख , मारूती देशमुख , महेंद्र देशमुख , सचिव संजय गोविलकर , वेहेरगावच्या सरपंच सौ.आर्चनाताई संदिप देवकर , विश्वस्थ सागर देवकर , विकास पडवळ , उपसरपंच काजल पडवळ , पोलिस पाटील आनिल पडवळ तसेच गुरव पुजारी यावेळी उपस्थित होते. देवस्थानचे व्यवस्थापक मंगेश गायकवाड , तसेच ग्रामस्थ , गुरव पुजारी , भाविक यावेळी उपस्थित होते.

कार्ला फाटा ते श्री एकविरा गड पायथा व वाहनतळापर्यत तसेच मंदिराचे परिसरापर्यत , लेणीसमोरची जागा तसेच दर्शनरांग येथे पुणे ग्रामिणचे पोलिसांकडून तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परिसरात दारूबंदी आदेश देण्यात आले होते.तसेच श्रीएकविरा गडावर डीजे लावायला तसेच फटाके वाजविण्यास बंदी घातली होती.

पुणे ग्रामिणचे पोलिस आधिक्षक अंकीत गोयल , अप्पर पोलिसअधिक्षक मितेश गट्टे , यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहाय्यक पोलिसअधिक्षक सत्यसाई कार्तिक , लोणावळा ग्रामिणचे पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ यांचे नेतृत्वाखाली चार पोलिस निरिक्षक, ३० सहाय्यक पीलिस निरिक्षक सुमारे तीनशे पन्नास पोलिस कर्मचारी ते गृहरक्षकदलाचे जवान , व स्टायकींग फोर्स ( दंगल काबू पथक ) तसेच असा बंदोबस्त तैनात होता.

यावेळी शेकडो दुकानदारांनी खेळणी , काहींनी स्थानिक दुकानदारांनी हार , फुले , पेढे , बर्फी , प्रसाद , दवणा , वेण्या , हार विक्री ची दुकाने लावली होती. काहींनी तसेच बाहेरगावच्या दुकानदारांनी खाद्यपदार्थ , शीतपेये , रस , उसाचा , लिंबाचा , रस तसेच ताक , यांची दुकाने , पाण्याच्या बाटल्या तसेच शोभेच्या वस्तु काहींनी दुकाने लावली होती.
अनैकानेक कोळीबांधव कुटूंबातील सदस्यांना घेवून बाळाचे नवस फेडायला आलेले होते . कोळीवाडा , ठाणे , कोकणातील पालख्या घेवून बरोबर डिजे घेवून कोळीबांधव आले होते..तालासुरातत नाचत गात दर्शनाचा आनंद घेत होते..आज पहाटे चेऊलचे आग्रावकर व ठाण्याचे वासकर यांच्या महिला तसेच स्थानिक महिलांनी देवीच्या मंदिरात तेलवान पाडले..तेलवणची गाणी गायली.

आज पहाटे पाच वाजता ते सात पर्यत आभिषेक , पुजा झाल्यावर मंदिरासमोर होमात तूप व नारळ यांचेबरोबर धान्य यांची आहुती टाकून होमहवन कार्यक्रम संपन्न झाला..रामनवमी उद्या आसल्याने आजच बळी होमामधे देण्यात आला.ही याञा पोर्णिमेपर्यत चालु राहणार असून सप्तमी आष्ठमी व नवमी हे तीन दिवस महत्वाचे असल्याने देवीचे याञेत दीड दोन लाख भाविकांकडून दर्शनास गर्दी केल्याने कोट्यावधी रूपयांची उलाढाल झाली.

कार्लाच्या श्रीएकविरा देवी मंदिरात पालखीची प्रदक्षिणा हजारो भाविकभक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!