आपला जिल्हाकृषीवार्ताक्रीडा व मनोरंजन

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या सहकार्याने मावळ तालुक्यातील नोंदणीकृत महिला बचत गट सदस्यांना मालाच्या विक्री साठी रोटरी तर्फे प्रशिक्षण शिबिर संपन्न.

Spread the love

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या सहकार्याने मावळ तालुक्यातील नोंदणीकृत महिला बचत गट सदस्यांना मालाच्या विक्री साठी रोटरी तर्फे प्रशिक्षण शिबिर संपन्न.In collaboration with Rotary Club of Talegaon Dabhade, a training camp was conducted by Rotary for the sale of goods to the registered women self-help group members of Maval taluka.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २ मार्च.

पंचायत समिती मावळ,रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि मावळ प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील नोंदणीकृत महिला स्वयंसहायता समूहातील महिलांची व्यवसायिक कौशल्य विकास कार्यशाळा गणेश मंगल कार्यालय, कामशेत येथे मोठ्या उत्साहात पार पडली!

तालुक्याचे गटविकास अधिकारी.सुधीर भागवत साहेब यांनी महिला बचत गटांना व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत व मार्गदर्शन पंचायत समितीच्या माध्यमातून करत असल्याचे सांगितले. आठवडी बाजार तर्फे गणेश चव्हाण यांनी येत्या काळात व्यवसाय वाढिसाठी महिला बचत गटांनी विक्री कौशल्य वाढवण्यावर भर दिला पाहिजे. रोटरी क्लब सदस्य यामध्ये बचतगटांना सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही दिली.

मावळ प्रबोधिनी अध्यक्ष. रवी भेगडे यांनी पुढाकार घेऊन आपल्या गटाच्या उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मावळ प्रबोधिनी कटिबद्ध आहे.यावेळी रिलायन्स रिटेल चे.शिशिर सिंग आणि सुनील काळे,शाश्वत कृषी विकास कंपनीचे संचालक.विजय ठूबे सर,आठवडे बाजार संकल्पनेचे निर्माते राजेश माने सर ई प्रमुख मान्यवरांनी उपस्थित राहून विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

याप्रसंगी रोटरी तर्फे रो मथुरे ,रो भालचंद्र लेले ,रो बालासाहेब चव्हाण, रो राजन आम्ब्रे,रो राजेंद्र गोडबोले रो अतुल हम्पे, रोप्रभाकर निकम,रो निलेश भोसले उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू भाऊ शिंदे,भाजपा कामशेत शहर अध्यक्ष प्रवीण भाऊ शिंदे,मावळ तालुका माथाडी कामगार संघटना अध्यक्ष.अशोक भाऊ सातकर, यांच्यासह मावळ तालुका उमेद अभियानांतर्गत काम करणारे सर्व कर्मचारी वर्ग व तालुक्यातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या!
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचायत समिती कार्यालयाचया प्रमुख इंगळे यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!