आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनसामाजिक

फिजिकल थिएटर” विषयी जाणून घेत कलापिनीत जागतिक रंगभूमी दिन साजरा.

Spread the love

फिजिकल थिएटर” विषयी जाणून घेत कलापिनीत जागतिक रंगभूमी दिन साजरा.Celebrating World Theater Day at Kalapini by learning about “Physical Theatre”.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २ एप्रिल.

स्वतःमधलं उत्तम शोधण्यासाठी मुक्तपणे विचार करून चौकटी पलीकडचा विचार केला तर कलाकार किंवा माणूस म्हणून जे समाधान आपण म्हणतो ते मिळू शकेल. असा सुंदर विचार घेऊन जागतिक रंगभूमी दिन खऱ्या अर्थानं साजरा झाला.

डॉ. शं. वा. परांजपे नाट्यसंकुलात “अवकाश” या समीप रंगमंचावर “फिजिकल थिएटर” विषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यासाठी सुरेंद्र टेकाळे हा युवक आला होता. बंगलोर, पौर्तुगाल, जपान, मेक्सिको अश्या जगभरातील विविध ठिकाणी त्याने या विषयीचं शिक्षण घेतले असून सध्या तो फ्रान्स मध्ये कार्यरत आहे. आपलं शरीर बोलतं, प्रेक्षकांशी संवादाशिवाय संवाद साधतं. चौकटी पलीकडे जाऊन एक विचार, भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते. ह्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यानी कलापिनीतील प्रेक्षक कलाकारांना करवून दिला. ते केवळ एक नृत्य नव्हते, नाटक नव्हते, तर तो एक मुक्त अविष्कार होता.


एखाद्या कल्पनेपाशी थांबून वर्ष वर्ष विचार केल्यानंतर फिजिकली शंभर वेळा सराव करून थकवा येईपर्यंत शेवटची पातळी ओलांडल्यानंतर गवसणारं समाधान म्हणजे परिपूर्ण कलाकृती हे सुरेंद्र ने स्वतःच्या कामामधून दाखवून दिले.
या प्रसंगी डॉ. अनंत परांजपे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला नयना डोळस या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या होत्या. त्यांनी त्यांचे अनेक अनुभव या वेळी सांगितले. स्पेशल चाईल्डस बरोबर कामं करताना नाटक हे कसं थेरपी म्हणून काम करतं ह्याची स्वतः अनुभवलेली अनेक उदाहरण त्यांनी सांगितली.त्यांनी आजवर अनेक राज्यस्तरीय बालनाट्यांचे दिग्दर्शन केलं असून, अनेक पारितोषिकं मिळवली आहेत. या प्रसंगी नयना डोळस आणि सुरेंद्र टेकाळे यांचा कलापिनी तर्फे सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे नियोजन डॉ.मीनल कुलकर्णी आणि संदीप मन्वरे यांनी केले होते. चैतन्य जोशी याने कार्यक्रमाचे सुंदर डिजिटल पोस्टर केले होते. आकांशा गजभिव हिने अतिशय सुंदर नाटकाचे मुखवटे चित्र रेखाटले होते. रश्मी पांढरे, अनघा बुरसे, प्रतीक मेहता, चेतन पंडित,चैतन्य जोशी, आदिती आपटे, स्वच्छंद, सायली रौंधळ यांनी पद्यामागची जबाबदारी उत्तम पार पाडली. डॉ. अनंत परांजपे, विश्वास देशपांडे, रवींद्र पांढरे आदि मान्यवर या वेळी उपस्थित होते.आंतरराष्ट्रीय पातळीवर काम पाहणाऱ्या कलाकाराच्या उपस्थितीमुळे खऱ्या अर्थाने जागतिक रंगभूमी दिन साजरा झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!