महाराष्ट्रसामाजिक

अर्जुन रामगिर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी ठाणे येथे भेट.

सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित नागरी प्रश्न सुटावेत या प्रामाणिक भावनेतून, सोलापूर ते मुंबई पायी चालत आलेले अर्जुन रामगिर यांची  ठाण्यात भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.

Spread the love

अर्जुन रामगिर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी ठाणे येथे भेट.Arjun Ramgir’s meeting with Chief Minister Eknath Shinde in Thane.

आवाज न्यूज : मुंबई वार्ताहर, २ एप्रिल.

सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित नागरी प्रश्न सुटावेत या प्रामाणिक भावनेतून सोलापूर ते मुंबई पायी चालत आलेले अर्जुन रामगिर यांची  ठाण्यात भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.

सोलापूर जिल्ह्यातील अनेक प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित राहिले असून त्यामुळे हा भाग विकासापासून वंचित राहिला आहे. तसेच जिल्ह्यातून गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू असल्याची बाब देखील त्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिली.

यावेळी त्यांचे म्हणणे समजून घेऊन सोलापूर जिल्ह्यातील विकासकामांना प्राथमिकता देऊन त्यातील जी कामे तातडीने सोडवता येथील ती नक्की सोडवू असे सांगून त्यांना आश्वस्त केले.

तत्पूर्वी मुंबईकडे येत असल्याची बातमी समजताच पनवेलचे माजी नगरसेवक प्रथमेश सोमण यांना त्यांच्याकडे पाठवून त्यांची विचारपूस केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!