आरोग्य व शिक्षण

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांची रेकॉर्ड तपासणी करा; अन्यथा आंदोलन करू

तळेगाव चाकण महामार्ग कृती समितीचा इशारा

Spread the love

तळेगाव : पिंपरी चिंचवड आयुक्तालया अंतर्गत तळेगाव चाकण आणि चाकण भोसरी रस्त्यावर लाॅकडाऊन अंतर अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या तीन चाकी रिक्षा चालकांची रेकाॅर्ड तपासणी करुन कडक कारवाई करावी अशी मागणी तळेगाव चाकण महामार्ग कृती समितीने केली आहे. अन्यथा 23 मार्च रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया समोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा कृती समितीने दिला आहे.

कृती समितीने पोलीस आयुक्तांना या संदर्भात निवेदन दिले आहे. या निवेदनात परप्रांतीय, परजिल्ह्यातील रिक्षाचालक कुठल्यातरी स्वयंघोषित स्थानिक नेत्यांची, संघटनांची नावे रिक्षाच्या हुडवर टाकून अवैध प्रवासी वाहतूक करतात. यामुळे पीएमपीएल सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे नुकसान होत असून वाहतूक नियमांची पायमल्ली होत असल्याचे म्हटले आहे.

तसेच हे रिक्षाचालक कुठल्याच वाहतूक नियमांचे पालन करत नाही आणि चौकात रस्त्यावर थांबून प्रवासी चढ-उतार करतात. या बेशिस्त व बेकायदेशीर रिक्षाचालकांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन अपघात वाढल्याचे निवेदनात म्हटले आहे.

विशेष पथकामार्फत तळेगाव चाकण आणि चाकण भोसरी रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांचे रेकॉर्ड तपासणीची मोहीम राबवण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

तसेच बेकायदेशीर रिक्षाचालकांना पाठबळ पुरवणाऱ्या संस्था, संघटना आणि व्यक्तींवर देखील कायदेशीर कारवाई करण्याची याबरोबरच विनापरवाना हद्दीबाहेरील रिक्षांचे चालक – मालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी तळेगाव चाकण महामार्ग कृती समितीने निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर समितीचे उपाध्यक्ष दिलीप डोळस व सचिव अमित प्रभावळकर यांची स्वाक्षरी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!