आरोग्य व शिक्षण

बेकायदेशीर उत्खनन करून आमदार सुनिल शेळके यांनी सरकारचा 10 कोटींचा महसूल बुडवला – किरीट सोमय्या

Spread the love

तळेगाव : मावळचे आमदार सुनिल शेळके मावळातील मंगळूर परिसरात बेकायदेशीर उत्खनन करत असून शेळके यांनी सरकारचा 10 कोटींचा महसूल बुडवला तरी राज्यातील सरकार त्यांना पाठीशी घालत आहे असा घणाघाती आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज तळेगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

मावळ तालुक्यात उत्खनन सुरु असणा-या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता, मागील दीड ते दोन वर्षात आमदार सुनील शेळके व त्यांची कंपनी बेकायदेशीर उत्खनन करत असून त्यामुळे राज्य सरकारचे दहा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच निसर्गाची अपरिमित हानी झाली आहे या उत्खननावर योग्य कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी यावेळी केली.

गेल्या आठवड्यात प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष व सचिव यांची यासंदर्भात भेट घेतली आहे. तसेच याबाबत मागील तीन वर्षातील सॅटेलाईटद्वारे घेतलेले नकाशे, पुरावे आम्ही केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री डॉ. अश्विनी चौबे यांना दिले आहेत. यासाठी विशेष टीम पाहणीसाठी मावळात पाठवावी अशी मागणी केंद्रीय पर्यावरण विभागाकडे केल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेच्या वेळी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे उपस्थित होते.

या आारोपांना आमदार सुनिल शेळके नेमके काय प्रत्त्युतर देतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!