आपला जिल्हा

राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेत वैष्णवी खिल्लारे प्रथम..

Spread the love

राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेत वैष्णवी खिल्लारे प्रथम..Vaishnavi Khillare stands first in state level general knowledge exam..

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी, ७ एप्रिल.

ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र संचलित आय एम विनर या राज्यस्तरीय परीक्षेत जांभूळ येथील जिल्हा परिषद शाळेतील वैष्णवी तुकाराम खिल्लारे ही राज्यात सर्वप्रथम आली आहे. तिला कविता जोशी यांनी केले. चिंचवड येथे झालेल्या कार्यक्रमात सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र तसेच रोख ५००० रू. देऊन तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, बालभारतीचे संचालक योगेश लिमये,ध्येय अकॅडेमीच्या संस्थापिका अर्चना शेंडगे तसेच शिक्षक व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

राज्यातील हजारो विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक मिळवणे ही बाब सोपी नसून यासाठी वैष्णवीने सातत्यपूर्ण अभ्यास केला आहे असे मत तिच्या वर्गशिक्षिका कविता जोशी यांनी व्यक्त केले. अशा परीक्षांमुळे स्पर्धा परीक्षेचा पाया भक्कम होऊन उत्तम तयारी होण्यास मदत होते अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापिका संगीता जगताप यांनी दिली. वैष्णवीच्या यशाबद्दल केंद्रप्रमुख अजित नवले, गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, सरपंच, उपसरपंच, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व शिक्षक वृंद यांनी कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!