अध्यात्मिकआपला जिल्हासामाजिक

वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा जोगेश्वरी मंदिरात उत्सवानिमित्त नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या वतीने आकर्षक रोषणाई .

Spread the love

वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा जोगेश्वरी मंदिरात उत्सवानिमित्त नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या वतीने आकर्षक रोषणाई.Attractive lighting on behalf of Mayor Mayur Dhore on the occasion of festival in village deity Shree Potoba Jogeshwari temple of Vadgaon.

आवाज न्यूज :  मच्छिंद्र मांडेकर, मावळ प्रतिनिधी, ७ एप्रिल.

वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा जोगेश्वरी मंदिरात उत्सवानिमित्त नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या वतीने आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
श्री काळभैरवनाथ (पोटोबा महाराज ) ,श्री जोगेश्वरी मंदिरात मंदिराचे मुख्य पुजारी यांचेकडून भाविकांना दर्शनासाठी जास्त वेळ लागणार नाही ,याची दक्षता घेतली जात आहे.

मंदिरात गुरव पुजारी यांचेकडून श्री पोटोबा महाराज श्री जोगेश्वरी माता यांचे गाभाऱ्यात आकर्षक पोशाख व अलंकार देवांना घालण्यात आल्याने व तसेच देवस्थानच्या वतीने आणि नगराध्यक्ष यांचेतर्फे रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट व विद्युतरोषणाई करण्यात आल्याने भाविकांकडून दर्शनासाठी रांगा लागत आहेत.

आज याञेतील मुख्य दिवस आसल्याने शेकडो वस्तूंच्या दुकानदारांनी , खाद्यपदार्थ , खेळणी , काॕस्मेटीक साहित्याची दुकाने यांनी वडगाव मधे उत्साहाचे वातावरण आहे.माञ आठ वाजून १५ मिनिटांनी ऐनवेळी अवकाळी पाऊस मेघगर्जनेसह , विजांच्या कडकडाटात पाऊस बरसू लागल्याने दुकानदारांनी मिळेल तिथे आसरा घेतला. त्यामुळे दुकानदारांची चांगलीच तारांबळ उडाली, तसेच काहींनी आधीच कागद टाकण्यात आल्याने वस्तु सुरक्षित राहण्यास मदत झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!