आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणसामाजिक

पराधीन आहे जगती- पुत्र मानवाचा. जिल्हा न्यायाधीश बिपिनचंद्रजी राठी-

Spread the love

पराधीन आहे जगती- पुत्र मानवाचा. जिल्हा न्यायाधीश बिपिनचंद्रजी राठी-Subordinate is the world – the son of man. District Judge Bipin Chandraji Rathi-

आवाज न्यूज : विशेष लेख मावळ, ७ एप्रिल.

दुपारचे बारा वाजले होते. पेशंटची वर्दळ कमी झाली होती.– इतक्यात चार-पाच माणसांचा घोळका कन्सल्टींगच दार उघडून आत शिरला! त्यांनी त्या व्यक्तीला कन्सल्टिंग टेबलावर झोपवलं .झोपलेल्या व्यक्तीकडे मी उत्सुकतेन बघितलं! साधारणपणे सहा फूट उंच, सावळा वर्ण ,काटकुळी शरीर यष्टी अशी ती व्यक्ती निपचीत पडली होती!मी प्रश्नार्थक दृष्टीने त्यांना घेऊन येणाऱ्या माणसाकडे पाहिल–त्यांनी सांगायला सुरुवात केली– डॉक्टर साहेब- यांच्याकडे दुर्दैवी घटना घडली त्यांच्या पंचवीस वर्षाचा एकुलता एक मुलगा रस्त्याने चालत असताना एका स्कूलबसने धडक दिल्याने जागेवरच मृत्यू पावला!गेले 24 तास त्यांनी धीरोदात्त पणे या अंतकरण विदीर्ण करणाऱ्या घटनेला सामोर जाऊन परिस्थिती अतिशय समंजसपणे हाताळली.


आपला कोणताही मनाचा तोल ढळू न देता सर्वउपचार आटोपून ते आज सकाळी बोलत असतांनाच अचानक बोलायचे थांबले !
त्यांची शुद्ध हरपली! त्यांनी हात-पाय वाकडे केले!आम्ही काही घरगुती उपाय केले पण काही यश आल नाही म्हणून आपणाकडे उपचाराला घेऊन आलेलो आहोत!
तरी त्यांना एकंदर शुद्धीवर आणा डॉक्टर!
आत्यंतिक मानसिक ताणामुळे मेंदूला ताण सहन न झाल्यामुळे अशी अवस्था त्यांची झाली होती हे मी माझ्या नजरेने टिपलं! चौकशी अंती त्यांच नाव बिपिनचंद्रजी राठी असं मला कळलं.मी योग्य ती तपासणी करून औषधोपचार सुरू केलेत!बिपिनचंद्रजिच्या प्रकृतीने माझ्या उपचारांना उत्तम प्रतिसाद दिला आणि काही तासातच ते शुद्धीवर आले! .थोडे स्थिरस्थावर झाल्यावर त्यांना कॉफी पिण्याचा आग्रह मी केला त्यांनीही माझ्या विनंतीला मान देऊन कॉफी घेतल्यानंतर आपला जीवनपट माझ्यासमोर उलगडून दाखविला.

भरून येणाऱ्या एखाद्या जखमेची खपली काढल्यानंतर आत साचलेल रक्त जास्त भरभरून वाहायला लागतो तसंच काहीस झालं.मनाच्या तळाशी असलेल जे काही होतं ते आपल्या शब्दात व्यक्त करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली!–डॉक्टरसाहेब मी तुम्हाला काय सांगू? कसं सांगू ?नियतीने माझ्याशी असा जबरदस्त खेळ खेळलेला आहे की, त्याला सामोरे जाणे खरोखरच माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला सहजासहजी शक्य नाही!माझे संपूर्ण आयुष्य मी कायद्याच्या फॅक्टरीतच जगलो!कारण मी स्वतः न्यायाधीश म्हणून कार्य कर्तुत्वाला सुरुवात केली! अतिशय पारदर्शक व स्वच्छ प्रतिमेमुळे बघता बघता मी जिल्हा न्यायाधीशाच्या पर्यंत पोहोचलो!दोन मुली व एक मुलगा साथीला सुविद्य पत्नी उत्तम अशी नोकरी! ,सामाजिक प्रतिष्ठा आणि संपन्नता असल्यामुळे माझ्यासारखा सुखी कोणी नाही असा मी_- आनंदाच्या लाटेवर विराजमान झालो होतो.दोन्ही मुलींना उत्तम स्थळ पाहून त्यांना त्यांच्या घरी अतिशय आनंदाने आम्ही उभयतांनी निरोप दिला!एकुलत्या एक मुलाला इंजिनियर केले, वयाच्या पंचविशीत पदार्पण करणारा- कोणतीही वैयक्तिक जबाबदारी नसलेला असा देखणा मुलगा पाहून लग्नासाठी अनेक स्थळं त्याला सांगून यायला लागलीत!

चोखंदळपणे त्यातून नववधूची निवड करताना सुसंस्कारात असलेल्या घराण्यातील मुलीची आम्ही निवड केली! आणि अत्यंत राजेशाही थाटात माझ्या मुलाच लग्न झालं—
ती तारीख होती 28 फेब्रुवारी 2009 !
जिल्हा न्यायाधीश असल्याने व समोरील मुलीकडील घराणे हे ही अत्यंत नावाजलेलं असल्यामुळे लग्न समारंभात उच्चभ्रू समाजातील सर्व स्तरांतील व्यक्तींनी या लग्नाला हजेरी लावली होती! मी आणि माझ्या पत्नीने सर्वांच स्वागत- आदर सत्कार केला.

या आठवणीतील दोन महिने कसे निघून गेले ते आम्हा सर्वांना कळलेच नाही!
या काळात आनंदाचा परमोच्च क्षण आम्ही अनुभवत होतो! आणि दिनांक 28 एप्रिल 2009 हा दिवस माझ्या मुलाच्या माझ्या परिवाराच्या आयुष्यातील तो अत्यंत काळा दिवस ठरला.तो दिवस म्हणजे माझ्या सुनेने पंख्याला स्वतःला लटकवून घेऊन आत्महत्या केली!बेंगलोर येथे ही घटना घडली! ती बातमी आम्हाला फोनवर कळली- ती कळल्यावर आम्ही अगदी स्तिमित झालो!तो आणि तो दिवस म्हणजे माझ्या सुखी कुटुंबाला लागलेली नजरच म्हणावी लागेल! तेव्हापासून आमच्या परिवाराला ग्रहणच लागल.

एका शांत डोहात एखादा धोंडा पडावा आणि त्यातील पाणी उसळून वर यावं ,तसाच प्रचंड गदारोळ झाला!
दोन्ही घराण्याला हादरा बसवणारी ही घटना असल्यामुळे प्रचंड उलथापालथ झाली .
सुशिक्षित ,सुसंस्कृत माहेश्वरी समाज ढवळून निघाला!
न्युजपेपर दूरदर्शन रेडिओ अशा -सर्वप्रसार माध्यमातून ही घटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली!
नवविवाहित वधु ज्यावेळी आत्महत्या करते, त्यावेळी सहाजिकच प्रथम गुन्हेगार म्हणून– तिचा पती,तिचे सासू-सासरे ,ननंद यांच्याचकडे समाज आणि कायदा बघत असतो! त्याप्रमाणेच पुढे सर्व काही घडत गेलं! .
सकृत्दर्शनी माझ्या मुलाचा काहीच दोष नसताना तो स्वतः एवढेच नव्हे तर माझ्या दोन्ही मुली आणि जावयांना पोलिस खात्याकडून अत्यंत मानसिक शारीरिक यातना सहन कराव्या लागल्या.या यातना अशा होत्या की, मी त्या कधीच विसरू शकत नाही!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!