आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

व्हिएसए अकॅडमीमध्ये एमएचटी- सीईटी साठी कार्यशाळा संपन्न..

Spread the love

व्हिएसए अकॅडमीमध्ये एमएचटी- सीईटी साठी कार्यशाळा संपन्न..Workshop for MHT-CET concluded at Visa Academy..

आवाज न्यूज : राजगुरुनगर, वार्ताहर ८ एप्रिल.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट तसेच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचालित तळेगाव येथील नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने राजगुरुनगर येथील व्हिएसए अकॅडमीमध्ये एमएचटी- सीईटी ची पूर्वतयारी कशी करावी या विषयवार नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली. या प्रसंगी अकॅडमीचे प्रमुख प्रा. विनोद चौधरी, नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रवेश प्रक्रियचे प्रमुख डॉ. शेखर राहणे उपस्थित होते.

या कार्यशाळेअंतर्गत अभियांत्रिकी प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे, वेगवेगळ्या महाविद्यालयामधील कोर्स निहाय गेल्या वर्षीचे कट ऑफ या संदर्भांतील माहिती देऊन सीईटी चा फॉर्म कसा भरावा याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत २६० विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी प्रत्यक्ष मदत करण्यात आली.

ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी चे प्रा. शंकरराव ऊगले, प्रा. हर्षल चौधरी, प्रा. ज्योती गोरे, प्रा. अनिरुद्ध डुबल, प्रा. सत्यजित शिरसाठ, प्रा. प्रतिक्षा तनपुरे, प्रा. आरती बिंदू, प्रा. कीर्ती टकले, प्रा. मनोज जुन्नरकर, प्रशांत सुतार यांनी मदत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!