आपला जिल्हासामाजिक

सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी ह.भ.प. कै.शांताराम दळवी यांचे निधन..

Spread the love

सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी ह.भ.प. कै.शांताराम दळवी यांचे निधन..Retired Railway Employees H.B.P. Kai Shantaram Dalvi passed away..

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी ८ एप्रिल.

सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी ह.भ.प. कै.शांताराम शंकर दळवी यांचे ता.५ रोजी दिर्घआजाराने निधन झाले.
त्यांचे पार्थिवावर भाजे येथील स्मशानभूमित तळ्याकाठी शोकाकूल वातावरणात राञी आठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांचे पश्चात पत्नी , एक भाऊ , दोन बहिणी , एक विवाहीत मुलगा , चार विवाहीत मुली , सून , नातवंडे , पुतने , जावई आसा परिवार आहे. कै.दळवी नवमी भजनी मंडळाचे क्रियाशील सभासद होते..त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रात , सामाजिक क्षेत्रात चांगले कार्य केल्याने त्यांना वारकरी भूषण म्हणून नुकतेच गौरविण्यात आले आहे. गेली दोन वर्षे मेंदू ची शस्ञक्रिया केल्याने ते आजारी होते. मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा मिञपरिवार मोठा होता. ते रेल्वेच्या ओ.एच.ई खात्यामधे फिटर म्हणून सेवानिवृत्त झाले होते.
भाजे विकास सोसायटी चे माजी चेअरमन वसंतराव दळवी हे त्यांचे जेष्ट बंधू होत. भाजे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आशोकराव वसंतराव दळवी हे त्यांचे पुतने होत. जेष्ठ कीर्तनकार भागवताचार्य ह.भ.प.तुषारमहाराज दळवी , माजी उपसरपंच अनिल दळवी , माजी सरपंच वाघू दळवी हे त्यांचे पुतने होत..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!