अध्यात्मिकआपला जिल्हासामाजिक

तळेगाव स्टेशन येथे श्री. हनुमान जयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी  साजरा  ..

Spread the love

तळेगाव स्टेशन येथे श्री. हनुमान जयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी  साजरा होत आहे .At Talegaon Station Mr. Hanuman Jayanti festival is being celebrated with various programs.

आवाज न्यूज:  तळेगाव दाभाडे वार्ताहर १० एप्रिल.

तळेगाव स्टेशन येथील श्री हनुमान जयंती सार्वजनिक उत्सव विविध धार्मिक, मनोरंजनाच्या कार्याक्रमाव्दारे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

आज सकाळी पुजा आणि अभिषेक मान्यवराच्या हस्ते होऊन उत्सवाच्या कार्याला प्रारंभ झाला. यामध्ये दुपारी भजन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला, सायंकाळी विविध वाद्यांच्या तालावर पालखीची ग्रामप्रदक्षिणा होणार आहे. रात्री येथील एसटी स्टँडच्या मैदानावर मालती इनामदार यांचा लोकनाट्य तमाशा आयोजित करण्यात आला आहे.

मंगळवारी ११ या. रात्री एसटी स्टँडच्या मैदानावर राधा पाटील मुंबईकर यांचा ऑर्केस्ट्रा होणार आहे. श्री हनुमान उत्सव समितीचे अध्यक्ष शुभम चिखले, कार्याध्यक्ष अविनाश मोहीते, राहुल चाबुकस्वार,वैभव विटे,उपाध्यक्ष विश्वनाथ कांबळे, ओंकार शिंदे,सचिव उत्तम ओसवाल, अशोक म्हाळसकर,खजिनदार अशोक ओसवाल आदींनी उत्सवाचे नियोजन केले असून या उत्सवानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष शुभम चिखले यांनी नागरिकांना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!