आरोग्य व शिक्षण

माझ्यावरील आरोपात तथ्य नाही; खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करू नये – आमदार सुनिल शेळके

Spread the love

तळेगाव : भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार व ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी काल माझ्यावर केलेले आरोप हे अर्धवट माहितीच्या आधारे केले आहेत. माझ्यावर केलेल्या आरोपात तथ्य नाही. माझ्यावर आरोप करताना ते पुराव्यानिशी करावे, खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करू नये असे प्रत्युत्तर आज झालेल्या पत्रकार परिषदेत विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी दिले.

काल माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार शेळके यांच्यावर दहा कोटीचा उत्खनन घोटाळा केल्याचा आरोप केला होता त्याला उत्तर देताना आमदार सुनील शेळके बोलत होते

लोणावळा व तळेगाव नगरपालिकेतील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करत आहे. तळेगाव नगर परिषदेमध्ये 40 ते 45 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. तलावातून बेकायदेशीर उत्खनन करण्यात आले आहे. या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत आहे.याची काही दिवसात चौकशी मंत्र्यासमोर होणार आहे. तालुक्यातील नगरपालिकामधील भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये यासाठी माझ्यावर दबाव तंत्राचा वापर होत आहे. चौकशी थांबविण्यासाठी माझ्यावर दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे. मी अशा कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही असे पत्रकार परिषदेच्या वेळी आमदार सुनील शेळके म्हणाले.

मी करत असलेल्या उत्खननासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड, महसूल विभाग, खनिकर्म विभाग, वीज वितरण या सर्व परवानग्या घेतल्या आहेत. बेकायदेशीर व्यवसाय करणे सोपे नाही. मावळातील काही मंडळी खोटं बोलून, वरिष्ठांना खोटी माहिती देऊन स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत असे शेळके म्हणाले.

मला जाणीवपूर्वक बदनाम करण्यात येत असले तरी तालुक्यातील जनता सुज्ञ आहे. चुकीचे काम केले तर जनतेने घरी बसवण्याआधी मी स्वतः घरी बसेल असे शेळके यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!