आपला जिल्हामहाराष्ट्र

कार्ल्यामध्ये अनधिकृत बांधकामाच्या विरोधात आमरण उपोषण सुरू..

किशोर आवारे , रविंद्र भेगडे, शरद हुलावळे , मिलींद बोञे यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट..

Spread the love

कार्ल्यामध्ये अनधिकृत बांधकामाच्या विरोधात आमरण उपोषण सुरू; किशोर आवारे , रविंद्र भेगडे, शरद हुलावळे , मिलींद बोञे यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट..Death fast begins in Karlya against unauthorized construction; Kishore Aware, Ravindra Bhegde, Sharad Hulawle, Milind Bone met the hunger strikers.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी ११ एप्रिल.

किल्ल्यामध्ये  महालक्ष्मी मंदिरामागे गट नंबर १४८ मध्ये अस्तित्वात असलेल्या रहमत मस्जिद च्या मागील जागेत मदरशाचे नावाखाली अनधिकृतरित्या बेकायदेशीर इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. हे अनधिकृत पाडून टाकावे , या मागणीसाठी कार्लातील सात कार्यकर्ते यांनी आज सकाळी दहा वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू केले आहे.या उपोषणाचे ठिकाणी महसूल खात्याकडून नायब तहसिलदार रावसाहेब चाटे , सह गटविकास आधिकारी प्रताप पाटील , कृषि आधिकारी संताजी जाधव , कार्लाचे मंडलअधिकारी माणिक साबळे , तलाठी मीरा बो-हाडे यांनी भेट घेवून उपोषण स्थगीत करण्याची विनंती केली.या अमरण उपोषणास सुमारे तीनशे मान्यवर हिंदू बांधवांनी भेट देवून पाठिंबा दर्शविला आहे.

कुसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच . अश्विनीताई ज्ञानेश्वर गुंड यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने पाठिंबा दिल्याचे पञ माजी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर गुंड , युवा कार्यकर्ते किसन गुंड यांनी दिले आहे. कुरवंडे च्या सरपंच.आनिता दिलीप कडू , यांनी तसेच युवा कार्यकर्ते हरीष पडवळ यांनी ग्रामपंचायतीचे वतीने उपोषणास पाठींबा दिल्याचे पञ देण्यात आले, यावेळी जनविकास आघाडीचे किशोर आवारे उपस्थित होते.

या उपोषणास पाठींबा देण्यासाठी सकाळ पासूनच हजेरी लावली आहे.त्यात भाजपचे तालुकाध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे , तसेच कुरवंडे चे माजी सरपंच सखाराम कडू , तळेगाव जनसेवा आघाडी चे संस्थापक अध्यक्ष  किशोरभाऊ आवारे , तसेच कार्यकर्ते , शिवसेना शिंदेगट पदाधिकारी व पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद हुलावळे , तसेच भाजपचे कामगारसेल अध्यक्ष अमोल भेगडे , देवळेतील भाजे विकास सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब आंबेकर , आदी मान्यवरांनी यावेळी तसेच शेकडो पदाधिकारी यांनी भेट दिली.

श्री महालक्ष्मी देवीचे मंदिरामागे रहेमत मस्जिदचे मागे गेल्या चार पाच महिन्यापासून अनधिकृत बेकायदेशीर मदरशाचे बांधकाम करण्यात आले आहे. सदर बांधकाम पीएमआरडीए किंवा ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता करण्यात आले आहे. तरी या विरोधात गावातील ग्रामस्थांतर्फे ता.२६ जानेवारी रोजी विशेष ग्रामसभेत ठराव करून ठराव क्रमांक ५,नुसार सदर बांधकाम पाडण्याची कारवाई कार्ला ग्रामपंचायत व पीएमआरडीए मार्फत करण्यात यावी असा ठराव एकमुखाने करण्यात आला आहे.
सदर बांधकामाचे शेजारी श्री एकविरा विद्या मंदीर व गुप्ता कनिष्ठ महावियालय याठिकाणी अनधिकृत बांधकामाचे विरोधात आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून सायंकाळी पाचपर्यंत, तीनशेच्यापुढे नागरिकांकडून पाठिंबा देणाऱ्या सह्या करण्यात आल्या आहेत.

माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब विश्वनाथ हुलावळे , सुखदेव राम हुलावळे , गणेश गोपीनाथ वायकर , समीर प्रकाश हुलावळे , आनिल सदाशिव हुलावळे , योगेश सुदाम हुलावळे , विनोद वसंत हुलावळे यांचेसह असंख्य ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत.
याबाबत पञकार व माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब हुलावळे , गणेश वायकर , आनिल हुलावळे , सुखदेव हुलावळे यांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यांनी पीएमआरडीए ने सदर आनधिकृत बेकायदेशीर इमारत पाडल्याशिवाय अमरण उपोषण सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
यावेळी कीर्तनकार तुषारमहाराज दळवी , मनविसेचे तालुका संघटक अशोक कुटे , माजी जिल्हा परिषद सदस्य मिलींद बोञे , तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!