आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणसामाजिक

पाॅस्को कंपनी आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे मावळातील नऊ शाळांना शैक्षणिक साहित्य भेट..

कंपनीतर्फे मिळालेल्या सुविधांचा छान वापर करा व मोठे झाल्यानंतर आपल्या शाळेसाठी मदत करा. नेहा वाकचौरे

Spread the love

पाॅस्को कंपनी आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे मावळातील नऊ शाळांना शैक्षणिक साहित्य भेट..Gift of educational materials to nine schools in Maval by Pasco Company and Rotary Club of Talegaon Dabhade.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १२ एप्रिल.

पाॅस्को कंपनी आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त प्रयत्नाने मावळातील सात शाळांना शैक्षणिक साहित्य आणि उपकरणे वाटप करण्यात आले. यामध्ये सरस्वती विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे, वरसुबाई माध्यमिक विद्यालय. माळेगाव, महादेवी माध्यमिक विद्यालय, इंगळूण, स्वामी समर्थ विद्यालय, बऊर, आदर्श माध्यमिक विद्यालय, तळेगाव दाभाडे, वर्क फाॅर इक्वॅलिटी, तळेगाव , जिल्हा प्राथमिक विद्यालय, इंदूरी या शाळांचा समावेश आहे.

या प्रकल्पाअंतर्गत पाण्याची टाकी, कम्प्युटर, सॅनिटरी वेडिंग मशीन, अत्याधुनिक साऊंड सिस्टिम , फळे ( black Board) व लाकडी बेंचेस देण्यात आले .त्याचा उद्घाटन कार्यक्रम सोमवार व मंगळवार दिनांक ११ व १२ एप्रिल रोजी संपन्न झाला. यावेळी पाॅस्को कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक. एस एच किम, संचालक जे के सीओ, प्रोडक्शन जनरल मॅनेजर अमोल बुधकाळे, एच आर हेड नेहा वाघचौरे, एच आर. विद्या व्यवहारे, रोटरी क्लब तळेगाव दाभाडे चे अध्यक्ष अनिश होले, सदस्य महेश महाजन, भालचंद्र लेले, ऋषिकेश कुलकर्णी , राजन आमरे यांचा या उपक्रमात मोलाचा सहभाग मिळाला.

आपल्या मनोगतात; कीम सर यांनी कंपनीचे सहकार्य जास्तीत जास्त देण्याचा आम्ही प्रयत्न करू असे मत व्यक्त केले. नेहा वाकचौरे विद्यार्थ्यांना संबोधित करताना कंपनीतर्फे मिळालेल्या सुविधांचा छान वापर करा व मोठे झाल्यानंतर आपल्या शाळेसाठी मदत करा असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.या प्रोजेक्ट साठी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!