आरोग्य व शिक्षण

अलायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवडच्या अध्यक्षपदी रामेश्वर बोंगाळे यांची निवड

Spread the love

चिंचवड : पुणे टेक्ट्रॉल प्रा लि, भोसरी येथे अलायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवडची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या वेळी २०२१-२२ या नवीन वर्षीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन व राष्ट्रवंदना करून करण्यात आली. यावेळी क्लबचे, कार्यकारी संचालक मंडळ उपस्थित होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे क्लबचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष नंदलालजी खटन व विनोदजी मित्तल तसेच अलायन्स क्लब ऑफ पुणे यांचे संचालक मंडळ उपस्थित होते. तसेच स्नेहछाया प्रकल्पाचे संचालक दत्तात्रय इंगळे विशेष उपस्थिती होती.

रामेश्वर बोंगाळे यांची अलायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवडच्या अध्यक्षपदी निवड झाली.उपाध्यक्षपदी राजेश वागूळदे तर सेक्रेटरी रखमाजी मटाले व खजिनदार म्हणून श्रीधर गळवे यांची एकमताने निवड झाली.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक श्री सुरेश कोटगिरे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमातील मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमचे स्थापना अधिकारी श्री विनोदजी मित्तल होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व त्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व कार्यकारिणीला पद व गोपनीयतेची शपथ दिली. या नंतर नवीन कार्यकारिणीची सत्कार करण्यात आला.

मावळते अध्यक्ष श्री निलेश नारखेडे यांनी २०२०-२१ या वर्षात क्लब ने कोरोनाच्या गंभीर परिस्थित केलेल्या सामाजिक कार्याचा अहवाल सादर केला.त्यामध्ये कोरोना जनजागृती, कोरोना प्रतिबंध साहित्य वाटप, अंध, अनाथ आश्रमांना किराणा व कपडे वाटप, गरजूना आरोग्यविषयक आर्थिक मदत, शालेय साहित्य वाटप, गोशाळेत चारा वाटप, मोतिबंदु शस्त्रक्रिया मदत अशा विविध समाजकार्याचा उल्लेख होता.

नवनिर्वाचित अध्यक्ष श्री रामेश्वर बोंगाळे यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले त्यांनी क्लबची मदत तळागाळातील गरजूपर्यंत पोंचविण्याचा निर्धार व्यक्त केला. येणाऱ्या वर्षात क्लब आरोग्य शिबीर, कोरोना जनजागृती, शिक्षण, वृक्षारोपण, नेत्रदान, गरजू अन्नधान्य मदत यामध्ये काम करेल असे सांगितले.

कार्यक्रमाचे व्यवस्थापन श्री प्रकाश शहापूरकर यांनी केले व सूत्रसंचालन श्री रमेश पाबळकर यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन राहुल हराळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता राष्टगीताने करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!