आपला जिल्हासामाजिक

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी स्वामी समर्थ डेव्हलपर्स माऊली मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल व पार्वती नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव नगरपंचायत येथेमोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न.

वडगाव नगरपंचायत येथे सर्व स्कूल बस, मिनीडोर, रिक्षा ड्रायव्हर यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Spread the love

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी स्वामी समर्थ डेव्हलपर्स माऊली मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल व पार्वती नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव नगरपंचायत येथेमोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न.Rotary Club of Talegaon MIDC Swami Samarth Developers Mauli Multi Specialty Hospital and Parvati Eye Clinic in association with Vadgaon Nagar Panchayat conducted a free eye check up camp.

आवाज न्यूज मावळ प्रतिनिधी, १४ एप्रिल.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी स्वामी समर्थ डेव्हलपर्स माऊली मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल व पार्वती नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव नगरपंचायत येथे सर्व स्कूल बस ,मिनीडोर ,रिक्षा ड्रायव्हर यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत शिबिराचा लाभ घेतला.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो गणेश भेगडे यांनी केले. त्यानंतर पार्वती नेत्रालयाचे संस्थापक रो डॉ अशोक दाते यांनी सर्व वाहन चालकांना नेत्र तपासणी का गरजेची आहे हे सांगून त्यांची काळजी कशी घ्यायची हे सांगितले. त्यानंतर सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष रो विन्सेंट सालेर यांनी यांच्या मनोगतात म्हणाले इथून पुढेही वडगाव नगरपंचायतीमध्ये अशी कार्यक्रम तसेच मार्गदर्शन तुम्हाला नेहमी करू .
सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रो शंकर हदिमनी यांनी केले.

सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी रो राहुल खळदे, रो रवी दंडगवाल,रो दशरथ जांभुळकर, रो योगेश शिंदे,रो डॉ दिनेश दाते तसेच पार्वती नेत्रालयातील स्टाफ यांनी मोलाचे सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!