आपला जिल्हानिधनवार्तासामाजिक

मुंबई पुणे महामार्गावर वरसोली हाॕटेल ७/१२ समोर आज्ञात वाहनाच्या धडकेने सिक्युरिटी कामगार आर्जून भानुसघरे यांचा मृत्यू ..

प्रवचनकार व किर्तनकार भिमाजी महाराज भानुसघरे यांचा सख्खा भाऊ व कीर्तनकार ह.भ.प.संदिपान महाराज शिंदे यांचे मामा..

Spread the love

मुंबई पुणे महामार्गावर वरसोली हाॕटेल ७/१२ समोर आज्ञात वाहनाच्या धडकेने सिक्युरिटी कामगार आर्जून भानुसघरे यांचा मृत्यू ..Security worker Arjun Bhanusghare died after being hit by a vehicle in front of Varsoli Hotel 7/12 on Mumbai Pune Highway.

आवाज न्यूज :  मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी १४ एप्रिल.

मुंबई पुणे महामार्गावर वरसोली टोलनाका पासून जवळच हाॕटेल ७/१२ समोर एका आज्ञात वाहनाच्या धडकेने सिक्युरिटी कामगार आर्जून चिंधू भानुसघरे हे जागीच मृत्यूमुखी पडले. प्रवचनकार व किर्तनकार भिमाजी महाराज भानुसघरे यांचा सख्खा भाऊ व कीर्तनकार ह.भ.प.संदिपान महाराज शिंदे यांचे मामा या आपघातात मृत्यूमुखी पडल्याने शिलाटणे गावावर शोककळा पसरली आहे.
अर्जून चिँधू भानुसघरे (वय-५८, धंदा – लोणावळा सिक्युरिटी फोर्स मधे , लोणावळा , येथे नोकरी ,रा शिलाटणे , ता-मावळ),असे मृताचे नाव आहे.

ता.११ रोजी सायंकाळी ४.१५ वाजणेचे सुमारास पुण्यावरून मुंबई बाजूकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा आपघात झाला. कोणत्यातरी आज्ञात वाहनचालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे भरधाव वेगाने रस्त्याचे परिस्थितीचा विचार न करता त्याकडे दूर्लक्ष करून वाहन हयगईने व अविचाराने चालवून रस्त्याचे कडेने पायी चालत जाणाऱ्या आर्जून चिँधू भानुसघरे (वय-५८) यास किरकोळ व गंभीर जखमी करून त्याचे मृत्यूस कारणीभूत झाल्याने व निघून गेल्याने मयताचे भावाकडून वाहनचालकाविरूध्द फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

ता.११ रोजी सायंकाळी एका इसमास अज्ञात वाहनाने आपघात केल्याने तो इसम मयत झाला आहे.तिथे एक इसम रस्त्याचे बाजूला बेशुध्दावस्थेत पडलेला आढळला. त्याचे डोक्यास मार लागलेला होता.त्यास पाहण्यास गेलेल्या रहिवाशी रमेश विकारी ,( रा -वाकसईचाळ) ,यांनी मयत कै.आर्जून भानुसघरे यांचा भाऊ ह.भ.प. भिमाजी भानुसघरे यांना खबर दिली. फोनवरून माहिती मिळताच घटनास्थळाकडे , जागेवर आल्यावर त्यांनी त्यांचा ओळखून भाऊ आसल्याचे सांगितले.

या आपघातप्रकरणी. भिमा चिंधू भानुसघरे (रा -शिलाटणे ) यांनी लोणावळा ग्रामिण पोलिसांत फिर्याद दिली. या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामिण पोलिसांकडून पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक भारत भोसले यांनी मृताचे खंडाळा येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. ता.१२ रोजी दुपारच्या साडेबारा चे सुमारास पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले.
या आपघात प्रकरणी लोणावळा ग्रमिण पोलिसांकडून भा.द.वि.कलम ३०४,२७९,३३७,३३८,मोटार वाहन कायदा कलम ३८४,१३४,(ब), १७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहनाच्या तपासासाठी नजिकचे सी सी टीव्ही फुटेज तपासण्यात येणार आहे,आसे पोलिसांनी सांगितले .
शोकाकूल वातावरणात आंत्यसंस्कार : सिक्युरिटी कामगार कम बदली ड्रायव्हर म्हणून काम करणारे कै.आर्जून चिंधू भानुसघरे यांचे पार्थिवावर शिलाटणे स्मशानभूमित शोकाकूल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रध्दांजलीपर भाषणे केली.
त्यांचे पश्चात पत्नी , दोन धाकटे भाऊ , एक बहीण , दोन मुलगे , तीन मुली , सून , नातवंडे , पुतने , आसा परिवार आहे. युवक कार्यकर्ते गणेश भानुसघरे व दिनेश भानुसघरे हे त्यांचे सुपुञ होत. तसेच कीर्तनकार भिमाजी भानुसघरे , व गणपत भानुसघरे हे बंधू होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!