अध्यात्मिकआपला जिल्हासामाजिक

दहा दिवसात अनधिकृत बांधकाम काढून घेण्याच्या अश्वसनानंतर कार्ला ग्रामस्थांचे लिंबूपाणी घेवून उपोषण मागे ..

Spread the love

दहा दिवसात अनधिकृत बांधकाम काढून घेण्याच्या अश्वसनानंतर कार्ला ग्रामस्थांचे लिंबूपाणी घेवून उपोषण मागे ..After the assurance of removing the unauthorized construction in ten days, Karla called off the hunger strike by taking lemonade from the villagers.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळाप्रतिनिधी १४ एप्रिल.

श्री एकविरा विद्या मंदिरापासून व लाजवती गुप्ता कनिष्ठ महाविद्यालयाचे समोर आणि श्री महालक्ष्मी मंदिरामागे अनधिकृत व बेकायदा बांधकाम केलेल्या घटनेमुळे ता.११ व १२ रोजी ग्रामस्थांतर्फे तीव्र आंदोलनाचा भाग म्हणून आमरण उपोषण करण्यात आले. तहसिलदारांनी ग्रामपंचायतीच्या वतीने दहा दिवसात अनाधिकृत बांधकाम काढून घेण्याच्या अश्वसनानंतर कार्ला ग्रामस्थांचे उपोषण मागे घेण्यात आले.

कार्ला गावातील गायरान जमिनीवर श्री माहालक्ष्मी मंदीर व रेहमत मस्जिद मागे जमिन गट नं. 148 मधील अनाधिकृत व बेकायदेशीर बांधकाम तात्काळ काढा या मागणीसाठी कार्ला ग्रामस्थांकडून  आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते. मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे व कार्ला ग्रामपंचायतीने सदरचे अनाधिकृत बांधकाम येत्या दहा दिवसाच्या आत काढून घेण्याची नोटीस दिल्यानंतर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले. या वेळी कार्ला ग्रामस्थ व पञकार भाऊसाहेब हुलावळे, पञकार गणेश वायकर, कार्यकर्ते समीर हुलावळे, अनिल हुलावळे, सुखदेव हुलावळे, योगेश हुलावळे, विनोद हुलावळे हे उपोषणास बसले होते.
मावळचे तहसिलदारांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना लिंबू सरबत देऊन उपोषण सोडण्यात आले. उपरोक्त संदर्भिय विषयान्वये आम्ही आपणास ग्रामपंचायत कार्ला मौजे कार्ला ता. मावळ, जि. पुणे यांसकडून प्रथम दर्शनीय केलेल्या चौकशी अन्वये सदरचे बांधकाम हे गट १४८ मध्ये असून शासनाच्या कोणत्याही संबंधित विभागाची परवानगी घेतलेली दिसून आलेली नाही , त्यामुळे सदरचे बांधकाम हे बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाले. ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ५३ अन्वये १० दिवसाची अनधिकृत बांधकाम स्वतः हून काढणेची मुदतीची नोटिस आज दि.१२/०४/२०२३ रोजी ग्रामपंचायतीचे मार्फत देत आहोत, तरी आपण आपले आमरण उपोषण मागे घ्यावे, असे लेखी पत्र उपोषणकर्त्यांना तहसिलदार मधुसूधन बर्गे,गटविकास अधिकारी सुधीर भागवत, सौ.सरपंच दिपाली हुलावळे यांनी दिल्यानंतर उपोषण सायंकाळी उशिरा मागे घेण्यात आले.

 

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद हुलावळे,माजी पंचायत समिती सदस्य व राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष दिपक हुलावळे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश ( तात्या ) भेगडे, कार्लाचे ग्रामसेवक सुभाष धोत्रे,तलाठी मिरा बो-हाडे यांंच्यासह सामाजिक कार्यक्रते विष्णू हुलावळे,सतीश मोरे,विनोद हुलावळे,प्रसाद हुलावळे,अमोल हुलावळे,नंदकुमार सोंडेकर,सुनिल हुलावळे,बंटी हुलावळे ,विशाल हुलावळे,ज्ञानेश्वर हुलावळे,अतिश हुलावळे,गणेश हुलावळे,साई वायकर,धीरज हुलावळे आणि आसंख्य कार्ला ग्रामस्थ उपस्थीत होते.

दोन दिवसात कार्ला परिसरातील देवले , भाजे , कुरवंडे , विविध ग्रामपंचायतींनी पाठींबा दिल्याची पञे देवून या उपोषणास पाठिंबा दिला., सरपंच, उपसरपंच, सदस्य, सर्व पक्षीय पदाधिकारी, बजरंगदल मावळ, विश्वहिंदू परिषद, हिंदू समिती कामशेत , लोणावळा शहर व ग्रामीण, मावळ तालुका वारकरी संप्रदाय यांच्यासह अनेकांनी उपोषणाला पाठिंबा दिल्याबद्ल उपोषणकर्त्यांनी सर्वांचे आभार मानले..
आनेक गावच्या महिला भजनी मंडळांच्यावतीने , तसेच मावळ तालुका वारकरी सांप्रदायाचेवतीने ” येथे भाजनाचा कार्यक्रम करून या उपोषणाला पाठिंबा देण्यात आला. .
या दोन दिवसांमधे या उपोषणकर्ते यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे , महिला आघाडी अध्यक्षा .सायलीताई बोञे , जनसेवा वाकास समिती तळेगाव दाभाडेचे किशोर आवारे , भाजपचे प्रदेश सरचिटणीस जितेंद्र बोञे , हिंदु समितीचे सुनिल गायकवाड , भरत भरणे , लाड , ब्रिजेस ठाकूर , तसेच माजी नगरसेवक दत्ताञेय यवले , मनविसेचे अशोक कुटे , मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार भसे , सचिव रामदास येवले , वेहेरगाव चे माजी सरपंच सचिन येवले , आदी येवून गेले.लोणावळा ग्रामिणचे पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ आणि त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!