ताज्या घडामोडी

चेंबूर घाटले गावदेवी उत्कर्ष मंडळाचा ५२ वा भव्य कला व क्रीडा महोत्सव

Spread the love

मुंबई – चेंबूरमधील सामाजिक क्षेत्रामध्ये नामांकित असलेल्या घाटले गावदेवी उत्कर्ष मंडळाचा यंदाचा ५२ वा भव्य कला व क्रीडा महोत्सव कोरोनामुळे दोन वर्षानंतर प्रथमच बेस्टचे माजी अध्यक्ष व स्थानिक नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या पुढाकाराने धुमधडाक्यात सुरू झाला आहे. गेल्या २५ दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवाचा समारोप सोहळा येत्या रविवार १ मे रोजी विविध मान्यवरांच्या सत्काराने आणि महापूजेच्या आयोजनाने पार पडणार आहे.

या कला व क्रीडा महोत्सवामध्ये आतापर्यंत घाटला चषक क्रिकेट स्पर्धा,कबड्डी स्पर्धा ,
हॉलीबॉल स्पर्धा कॅरम स्पर्धा , विकलांगांसाठी क्रिकेट स्पर्धा ,संगीत खुर्ची तसेच महिलांसाठी चैत्र हळदी कुंकू समारंभ पार पडले असून १ मे पर्यंत आणखी कला व क्रीडा स्पर्धा पार पडणार आहेत.या महोत्सवाचे वैशिष्ट असे की या महोत्सवाच्या समारोप सोहळ्यास सर्व पक्षीय राजकीय आणि सामाजिक मान्यवर मंडळी आवर्जून हजेरी लावत असतात.
यावेळी ५०, ५१ आणि ५२ असा तीन वर्षांचा कार्यक्रम एकत्रित समजून पार पडणार आहे.या सर्व स्पर्धा घाटले गावदेवी मैदानात पार पडत असून दररोज या स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी रेलचेल दिसत आहेत.हा महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य भरपूर मेहनत घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!