आरोग्य व शिक्षण

तातडीच्या रूग्णसेवेविना लोणावळा ग्रामिण परिसरात रूग्णांचे हाल ; मृत्यूच्या प्रमाणात वाढ

Spread the love

लोणावळा : तातडीने रूग्णांना उपचार मिळत नसल्याने लोणावळा ग्रामिण परिसरात रूग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे.

रक्त ,एक्सरे आदी सुविधासाठी मळवलीत कार्लामध्ये सुवीधा नाही. रूग्णांना लोणावळ्याच्या नामांकीत हॉस्पिटलमध्ये पाठवले जाते किंवा सोमाटणेफाटा येथे पाठवले जाते. अनेक रूग्ण वाटेतच प्राण सोडतात. मावळात, लोणावळा शहरात तसेच जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने कार्ला पी.एच सी अंतर्गत औंढे खुर्द ,भाजे आदी ठिकाणी असलेल्या उपकेंद्रात निवासी डाॕक्टर व परिचारिका तसेच कर्मचारी नेमावेत.

कार्ला आरोग्य केंद्रातर्फे रक्त,लघवी,तसेच एक्सरे काढणे,लहान मोठी शस्ञक्रिया आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.खाजगी रूग्णालयाची फी गोरगरीब जनतेला परवडत नाही.काही क्लिनिकमधे साधी रक्त , लघवी चाचणी करत नाही.लोणावळा किंवा पवना हॉस्पिटलमध्ये सोमाटणे येथे पाठवले जाते. नवीन जिल्हा रूग्णलयाचे काम सुरू झाले नाही.काम होण्यासाठी आवधी लागणार असल्यामुळे आमदारांनी तातडीने या आरोग्य सुविधा पुरवल्यास जाण्यासाठी लागणारा वेळ वाचेल व रूग्ण दगावण्याची संख्या कमी होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!