आरोग्य व शिक्षण

सदापूर येथील भजन गायिका सुगंधा उर्फ ताईबाई ढाकोळ यांचे निधन

Spread the love

लोणावळा : सदापूर येथील भजन गायिका सुगंधा उर्फ ताईबाई जयवंत ढाकोळ  यांचे वयाच्या 50 व्या वर्षी अल्पशः आजाराने गुरूवार (२८ऑक्टोबर) रोजी निधन झाले. त्यांचे पार्थिवावर सदापूर येथील इंद्रायणीनदी काठावर स्मशानभूमित शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांचे पश्चात पती , दोन विवाहित मुली , एक विवाहित मुलगा, सून,जावई , सासू व नातू असा परिवार आहे.

लोणावळा नगरपरिषदेचे अस्थापना विभागातील अधिकारी व गायक आणि हार्मोनियम विशारद ह.भ.प. जयवंत ज्ञानेश्वर ढाकोळ हे त्यांचे पती होत. कीर्तनकार व प्रवचनकार ह.भ.प.प्रशांत महाराज ढाकोळ हे त्यांचे सुपुञ होत. त्यांचे सासरे ह.भ.प.ज्ञानोबा ढाकोळ हेही कीर्तनकार होते.

त्यांना माहेराहून वडील वैकुंठवासी नारायण दळवी यांचेकडून वारकरी सांप्रदायाचा वसा लाभलेला होता. कै.ताईबाई ढाकोळ या सदापूर येथील संतकृपा भजनी मंडळामधे गायिका म्हणून नावाजलेल्या होत्या . या संतकृपा भजनी मंडळाने तळेगाव येथे नवराञौत्सवानिमित्त आयोजित शारदिय नवराञौत्सव भजनस्पर्धेत २५ संघामधून तृतीय क्रमांक मिळविला होता. त्यांच्या आकाली निधनामुळे पंचक्रोशित हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!