ताज्या घडामोडी

विद्यमान आमदार आभासी नंदनवनात – सत्यजित देशमुख.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी – विद्यमान आमदारांनी आभासी नंदनवनातून बाहेर पडावे. ज्या सरकारला शिव्याशाप देता त्यांनीच मंजूर केलेल्या विकासकामांची आपणं भुमिपूजन करत सुटला आहात हे विसरु नका. तर जलजीवन मिशन योजनेची उद्घाटने रोज करता परंतु त्या योजनेचे सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. या योजनेशी तुमचा काडीमात्र संबंध नाही. असे प्रतिपादन भाजपा नेते सत्यजित देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केले.
शिराळा विधानसभा मतदारसंघातील रस्ते व पूल कामांसाठी अर्थसंकल्पामध्ये २७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून पाच रस्ते व एक पुलास मंजुरी मिळाली आहे.तसेच वाकुर्डे बुद्रुक योजनेसाठी ७० कोटी रुपयांचा निधी ची तरतूद करण्यात आले आहे. अशी माहिती सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची संचालक सत्यजित देशमुख यांनी शिराळा येथे पत्रकार परिषद मध्ये दिली.
यावेळी बोलताना सत्यजित देशमुख म्हणाले :- राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शिराळा विधानसभा मतदारसंघातील रस्ते व पूल कामासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे निधीची मागणी केली होती. या मागणीनुसार रस्ते कामांसाठी २५ कोटी रुपये चा निधी मंजूर झाला आहे .यामध्ये करंजवडे, ठाणापुठे, देववाडी अप्रोच रस्ता व संरक्षण भिंत २ कोटी ५० लक्ष, आरळा ते गुढे रस्ता ६ कोटी, शेडगेवाडी ते चांदोली धरण रस्ता ४ कोटी ५० लक्ष, मांगले ते वारणा नदी रस्ता रस्ता-३ कोटी,कांदे-वारणा नदी रस्ता ४ कोटी, सागाव कणदूर पुनवत मांगरूळ रस्ता ६ कोटी तर कापरी सुजयनगर पूल २०२१ च्या पावसाळ्यामध्ये पडला होता. या पुलाच्या नवीन बांधकामासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच शिराळा विधानसभा मतदारसंघांमध्ये पहिल्यांदाच हॅबिट एनेव्हिटी (एच.ए.एम) मधून शेंडगेवाडी चांदोली खुंदलापुर हा रस्ता २७ किलोमीटर व कापरी ते येडेनिपाणी बावची पर्यंतचा रस्ता २९ किलोमीटर हे दोन्ही रस्ते रस्ते नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून केले जाणार आहेत.
यावेळी सत्यजित देशमुख म्हणाले:- वाकुर्डे बुद्रुक करण्यासाठी ८० कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ७० कोटी रुपये शिराळा तालुक्यातील योजनेसाठी व दहा कोटी रुपयांचा निधी कराड तालुक्यासाठी मंजूर झाला आहे.त्याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी २५ कोटी व स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब यांच्या स्मारकासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निर्णयाचे स्वागत सर्वसामान्य जनतेतून होत आहे.कोकरूड या ठिकाणी स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब यांचे भव्य दिव्य स्मारक होणार आहे.तसेच वाटेगाव या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक ऐतिहासिक स्मारक उभारली जाणार आहे. यावेळी विरोधकांवर बोलताना सत्यजित देशमुख म्हणाले, विद्यमान आमदारांनी आभासी नंदनवनातून बाहेर पडावे. ज्या सरकारच्या प्रतिनिधींवर तुम्ही शिव्या शाप देता. त्यांच्या माध्यमातून झालेल्या कामांची उद्घाटन तुम्ही करत आहात. जलजीवन मिशन योजनेची उद्घाटने रोज करता परंतु त्या योजनेचे सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. या योजनेची तुमचा काडीमात्र संबंध नाही. शिराळा अर्बन बँकेच्या ठेवीदारांना ८६ कोटी रुपये चा परतावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेमुळे झाला. पाच लाखापर्यंतच्या सर्व ठेवीदारांना ठेवी केंद्र सरकारच्या माध्यमातून परत मिळाल्या. परंतु त्यांचा कधीही उल्लेख या महाशयाने केला नाही.उलट हे सर्व आमच्या मुळे व राष्ट्रवादीच्या नेत्यामुळे झाले असा घोषणा करता.या ठेवीचा परतावा परत मिळाल्यामुळे आज गोरगरिबा जनता त्यातून सुटली आहे.
त्यांनी हिम्मत दाखवून कधीही ज्याच्यामुळे काम झालं त्याला श्रेय द्यावे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ही राज्य सरकारची योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हे नाव कधीही घेणार नाहीत.स्वतःच्या स्वार्थापलीकडे यांना कधीही काही दिसलेले नाही. त्यांनी आमच्यावर बोलावे ही दुर्दैवी बाब आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!