आपला जिल्हानिधनवार्तामहाराष्ट्रराजकीय

सर्व पक्ष शोकसभेत स्वर्गीय गिरीश बापट यांना श्रद्धांजली अर्पण..

यशवंतनगर येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बायोडायव्हर्सिटी उद्यानाला गिरीश बापट बायोडायव्हर्सिटी उद्यान असे नामकरण करून त्या ठिकाणी त्यांच्या नावे कट्टा उभारण्याचा प्रस्ताव या शोक सभेत मांडण्यात आला.

Spread the love

सर्व पक्ष शोकसभेत स्वर्गीय गिरीश बापट यांना श्रद्धांजली अर्पण.. Tribute to late Girish Bapat in all party mourning meeting..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर, २१ एप्रिल.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार स्वर्गीय गिरीश बापट यांच्या स्मरणार्थ सर्व पक्षीय श्रध्दांजली सभा गुरुवार दिनांक २० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता नाना नानी पार्क सभागृह येथे संपन्न झाली. यावेळी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात स्व. गिरीश बापट यांच्या प्रतिमेला ज्येष्ठ मार्गदर्शक गणपतराव काळोखे गुरुजी आणि मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
स्वर्गीय गिरीश बापट यांच्या आठवणींना उजाळा देताना शेवटपर्यंत त्यांनी तळेगाव आणि मावळशी जपलेलं घट्ट नातं, मतदार संघातील प्रत्येक व्यक्तीशी असलेला त्यांचा वैयक्तिक संबंध, कार्यकर्त्यांना भक्कम पाठबळ आणि उभारी देण्याची त्यांची शैली, राजकारण विरहित सर्व पक्षीय नेत्यांशी नातेसंबंध जपण्याचं त्यांचे कौशल्य याविषयी बोलताना गिरीश बापट यांच्या जाण्याने कधीही भरून न येणारी राजकीय पोकळी निर्माण झाल्याची भावना सर्वांनीच व्यक्त केली.

तळेगावच्या या सुपुत्राला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी यशवंतनगर येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बायोडायव्हर्सिटी उद्यानाला गिरीश बापट बायोडायव्हर्सिटी उद्यान असे नामकरण करून त्या ठिकाणी त्यांच्या नावे कट्टा उभारण्याचा प्रस्ताव या शोक सभेत मांडण्यात आला.

या कार्यक्रमामध्ये मावळचे विद्यमान आमदार सुनिल शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जनसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, माजी नगराध्यक्ष रविंद्रनाथ दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश काकडे, भाजप शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने, माजी उपनगराध्यक्ष सुशिल सैंदाणे, कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे, डॉ. शाळिग्राम भंडारी, मनसे नेते सचिन भांडवलकर, रिपब्लिकन पक्ष शहराध्यक्ष संदिप शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्षा शैलजा काळोखे, शिवसेना शहर प्रमुख दत्तात्रय भेगडे, शिवसेना (उ.बा.ठा.) शहर प्रमुख देवा खरटमल, ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय मेढी, दौलत भेगडे यांनी स्व.बापट साहेब यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस प्रमोद देशक आणि सरचिटणीस विनायक भेगडे यांनी केले. पसायदानाने शोक सभेची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमास सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन व सहकार्य भाजपा नेते अशोक काळोखे आणि भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे शहर कार्यकारिणी, मोर्चा – आघाडी पदाधिकारी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!