आरोग्य व शिक्षण

औढोली ते दुधिवरे रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी

औंढोली ते श्री क्षेत्र दुधिवरे प्रतिपंढरपूर रस्त्यावर अनेक खड्डे पडल्याने वाहनचालक हैराण

Spread the love

लोणावळा : औंढोली ते पवनाधरणाकडे जाणारा रस्ता दुधिवरेखिंड व चढ चढताना खड्डे पडल्याने वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. या रस्त्याची डागडुजी करून पर्यटक व प्रवाशी यांचे सोयीचा रस्ता बनवावा ,आशी मागणी ग्रामस्थांची आहे.

औंढोली येथील माजी ग्रामपंचायतीचे सदस्य कैलास मांडेकर तसेच लोणावळा जेली उत्पादक अंकुश मांडेकर , सामाजिक कार्यकर्ते सदू मांडेकर , ग्रामस्थ गुलाब विश्वासराव , गणेश जांभूळकर यांनी मागणी केली आहे.

शेकडो वाहने या रस्त्याने रोज ये जा करतात. दुधिवरेखिंड येथे फोटो काढणे व सेल्फी काढण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. त्यामुळे या रस्त्याच्या डागडुजीची गरज आहे ,असे ग्रामस्थ यांनी मागणी केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!