आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

प्रलंबित नागरी सुविधांच्या कामांना प्राधान्य;प्रेस फौंडेशनच्या वार्तालाप कार्यक्रमात नूतन मुख्याधिकारी एन.के. पाटील यांची ग्वाही.

Spread the love

प्रलंबित नागरी सुविधांच्या कामांना प्राधान्य;प्रेस फौंडेशनच्या वार्तालाप कार्यक्रमात नूतन मुख्याधिकारी एन.के. पाटील यांची ग्वाही.Pending civic amenities works to be prioritized; New CEO N.K. Testimony of Patil.

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे वार्ताहर २५ एप्रिल.

तळेगाव दाभाडे २४ एप्रिल, (आ.प्र.) : पाणी, पर्यावरण, आरोग्य अंतर्गत रस्ते याबरोबरच प्रलंबित नागरी सुविधांच्या कामांना आपण सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याची ग्वाही नूतन मुख्याधिकारी एन.के. पाटील यांनी दिली. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदाची सूत्रे त्यांनी आज ( 24 एप्रिल) स्वीकारली. त्यानंतर झालेल्या तळेगाव दाभाडे प्रेस फौंडेशनच्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगररचनाकार राहुल गित्ते, कार्यालयीन अधीक्षक रवींद्र काळोखे उपस्थित होते.

पदभार हाती घेतल्यानंतर पाटील यांनी नगरपरिषदेच्या प्रत्येक विभागाची पाहणी केली. अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी थेट संवाद साधून माहिती घेतली. त्यानंतर झालेल्या वार्तालापादरम्यान ते म्हणाले, की नागरिकांना हेलपाटे मारण्यास लागू नयेत अशा प्रकारे कामांचे नियोजन करणार आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाच्या प्रमुखांशी चर्चा करून माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे.

 

केंद्र आणि राज्य सरकारी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी आणि लाभार्थ्यांना वेळेत लाभ व्हावा, यावर विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. विस्तारणारे शहरीकरण आणि नागरी सुविधा हे प्रशासनासमोरील महत्वाचे काम असल्याने त्या दृष्टीने नियोजनबद्ध कामाचे नियोजन करण्याची गरज असल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल पाटील यांनी सांगितले. सोलापूर आणि मराठवाड्यातील प्रशासनातील उपायुक्त म्हणून केलेल्या कामाचा अनुभव येथील आव्हाने पेलताना उपयोगी ठरेल असा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गित्ते यांनी शहरातील नागरिकांसाठी सुरू केलेल्या ऑनलाइन सिस्टीमची माहिती दिली.

प्रेस फौंडेशनचे अध्यक्ष अमीन खान यांनी प्रास्ताविक केले. विलास भेगडे यांनी परिचय करून दिला. रमेश जाधव गुरुजी, राजेश बारणे, महेश भागीवंत, संजय जगताप आदिंनी मुख्याधिकारी पाटील यांचा स्वागत सत्कार केला. रवींद्र काळोखे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!