आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

श्रीएकविरा , दुर्गापरमेश्वरी , जोगेश्वरी सामुदायिक विवाह सोहळ्यात  १६ जोडपी विवाहबध्द ..! !

श्रीएकविरा , दुर्गापरमेश्वरी , जोगेश्वरी सामुदायिक विवाह सोहळ्यात  १६ जोडपी विवाहबध्द झाली. ढोलताशांच्या मिरवणूकीने नवरदेवांची वरात झाली. जेवण , मान , सन्मान आदी कार्यक्रमांनी व सनई चौघड्याचे सुरांनी आणि तात्यांच्या मंगलाष्टकांनी विवाह सोहळा वेळेत संपन्न झाला.

Spread the love

श्रीएकविरा , दुर्गापरमेश्वरी , जोगेश्वरी सामुदायिक विवाह सोहळ्यात  १६ जोडपी विवाहबध्द ..! !खासदार राजूशेठ शेट्टी , श्रीरंग आप्पा बारणे , आमदार सुनिलआण्णा शेळके , माजी राज्यमंञी बाळाभाऊ भेगडे यांची उपस्थिती..

आवाज न्यूज:लोणावळा प्रतिनिधी २५ एप्रिल.

श्रीएकविरा , दुर्गापरमेश्वरी , जोगेश्वरी सामुदायिक विवाह सोहळ्यात  १६ जोडपी विवाहबध्द झाली. ढोलताशांच्या मिरवणूकीने नवरदेवांची वरात झाली. जेवण , मान , सन्मान आदी कार्यक्रमांनी व सनई चौघड्याचे सुरांनी आणि तात्यांच्या मंगलाष्टकांनी विवाह सोहळा वेळेत संपन्न झाला.

खासदार राजूशेठ शेट्टी , श्रीरंग आप्पा बारणे , आमदार सुनिलआण्णा शेळके , माजी राज्यमंञी बाळाभाऊ भेगडे , पुणे जिल्हा बँकेचे संचालक माऊली दाभाडे , सँत तुकाराम कारखाना उपाध्यक्ष बाप्पूसाहेब भेगडे , स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रमेशभाऊ साळवे , माजी पंचायत समिती सभापती शरद हुलावळे , माजी शिवसेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे , माजी पंचायत समिती सभापती राजाराम शिंदे , जेष्ट नेते माऊलामामा शिंदे यांनी भेट देवून सामुदायिक विवाह सोहळ्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शिंदेगट राजूशेठ खा़डभोर आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस जितेंद्र बोञे , महिला आघाडीच्या तालुका संघटिका सायलीताई बोञे , कार्लाच्या सरपंच सौ.दिपालीताई हुलावळे , उपसरपंच किरणशेठ हुलावळे , पंचक्रोशितील सरपंच , उपसरापंच यांनी हजेरी लावली.

या सामुदायिक विवाह सोहळ्याचे संस्थापक भाई भरत मोरे , दिपकशेठ हुलावळे , मिलिंदशेठ बोञे आणि अजय शिराली हे आहेत.यावेळी सर्वांचे स्वागत करताना माजीमंञी बाळाभाऊ भेगडे म्हणाले , ” श्रीएकविरा , दुर्गापरमेश्वरी , जोगेश्वरी सामुदायिक विवाहसोहळा सन २०२३ यावर्षी चे सोहळा समितीचे कार्यकारीणीवर अध्यक्ष पै.संभाजी येवले , कार्याध्यक्ष सोमनाथ जांभळे , उपाध्यक्ष प्रकाश आगळमे , खजिनदार संतोष भानुसघरे , सहखजिनदार गणपत विकारी , सचिव किरण सु.येवले , सहसचिव संतोष र ढाकोळ , असे पदाधिकारी या कार्यकारीणीवर आहेत. यावर्षी ११ वर्षे होत असताना रायगड , जिल्हातील , पुणे , पुरंदर येथील नववधू व नवारदेव यात सहभागी झाले आहेत,सुमारे २२ कुटूंब मावृळातील आहेत.बाकीची कर्जत , रायगड , पुरंदरचे , आहेत. असे सोहळे होणे ही काळाची गरज आहे.
यावेळी खासदार श्रीरंग आप्पा बारणे म्हणाले , श्रीएकविरा , दुर्गापरमेश्वरी , जोगेश्वरी सामुदायिक विवाह सोहळ्यात आज १६ जोडपी विवाहबध्द होत आहेत. या सामुदायिक विवाह सोहळ्यानिमित्त समाजातील आनेकांना एकञ करायचे काम या ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

यातून समाजाला दिशा दिली जात आहे.यातून समाजाचा वेळ वाचतो.कित्येक तास कधीकधी महिला भगिनींना ताटकळत थांबावे लागते , त्यामुळे वेळेत विवाह सोहळा संपन्न होत असताना मी संस्थापक भाईभरत मोरे , दिपकशेठ हुलावळे , मिलींदशेठ बोञे , , अजय शिराली आणि आमच्या गुलाब तिकोणे यासही धन्यवाद देतो.त्यांनी सामुहीक विवाह सोहळ्यात आपल्या मुलाच्या विवाहाचेही काम केले आहे.
कित्येक दाणशूर व्यक्तीच्याकडून शिलाई मशीन , तसेच सोन्याचे दागिणे देण्याचे कार्य करण्यात आले आहे,सर्वांना मी धन्यवाद देतो. नियोजित वधुवरांचे आयुष्य सुखा चे , समृद्धीचे , आरोग्यपूर्ण जावो.तसेच सर्वांना दिर्घायुष्य लाभावे , अशी प्रार्थना करतो.
यावेळी मा.खासदार राजूशेठ शेट्टी म्हणाले , ” या सामुदायिक विवाह सोहळ्याचे निमित्ताने सातत्याने सलग आकरा वर्षे सर्वसामान्य कुटूंबातील वर वधू यांचा विवाह लावण्याचे मोलाचे काम केले आहे. यावर्षी ही समाजातील दानशूर घटकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.याचा मला आभिमान वाटतो.

श्रीमंत लोक मोठ्या थाटामाटात लग्ने लावतात , ते पाहून लाजेकाजे सर्वसामान्य वरबाप जमिनीचा तुकडा विकून कर्जबाजारी होतो व त्याँची बरोबरी करायला पहातो,पण हे या सामुदायिक विवाह सोहळ्यानिमित्त थांबले जाईल. मदत करणारे हजारो हात आहेत.देणाऱ्या ने देत जावे , घेणाऱ्याने घेत जावे व घेताघेता समाजासाठी काही देण्याचा गुण घ्यावा , असे शेट्टी म्हणाले.
यावेळी आमदार सुनिलआण्णा शेळके म्हणाले , ” या सामुदायिक विवाह सोहळ्यानिमित्त राजकीय , सांप्रदायिक , सामाजिक , सर्व क्षेत्रातील लोक सहभागी झाले आहेत. ट्रस्टचे माध्यमातून ११ वर्षे हा सोहळा होत आहे.रायगड , पुणे जिल्हा येथील सर्वसामान्य व चांगल्या घराण्यातील वधु वर यांनी सहभाग घेतला ही आनंदाची घटना आहे.यात कुणी आन्नदान केले , तर कुणी सोने दान केले आहे.कन्यादानही श्रेष्ठ आहे.यावेळी माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे , संत तुकाराम कारखान्याचे उपाध्यक्ष बाप्पूसाहेब भेगडे यांनीही शुभेच्छा दिल्या.

यावेळी कीर्तनकार ह.भ.प.तुषारमहाराज दळवी म्हणाले , यावर्षी हा सोहळा संपन्न होत आसताना ११ व्या वर्षी १६ जोडपी विवाहबध्द होत आहेत.त्यामुळे सर्वांचे सोळा तास , ठिकाणी जाण्यापासून वाचले आहे.
सर्वा़नी राजकीय जोडे बाजूला काढून यात सहभाग घेतल्याने याला विशेष महत्व आहे.
ब्रम्हचर्य , गृहस्थाश्रमात , वानप्रस्थाश्रम आणि संन्यास या आश्रमापैकी तुकाराम महाराज यांनी गाथामधे म्हटल्याप्रमाणे , ” कल्याणते आसो क्षेम ! वाढो प्रेम आगळे ! ! धन्य गृहस्थाश्रमा म्हणताना सोळा संस्काराशिवाय गृहस्थाश्रम नाही ! यामुळे गणेशपूजा , वरूणपूजा व व मंगलस्तवन येथे करण्यात येते.व आपल्या हातातील आक्षता टाकून या नवदांपत्यांचे आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.

यावेळी खासदार राजूशेठ शेट्टी यांचेसह सर्व मान्यवरांचा शाल , पुष्पगुच्छ , श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.
यवेळी अनेक मान्यवर संयोजक म्हणून या सामुहिक विवाह सोहळ्याची जबाबदारी पार पाडण्यात सहभागी होते. यावेळी पुणेजिल्हा परिषद कृषी खाते सभापती बाबुराव वायकर , संत तुकाराम महाराज सेवा समिती अध्यक्ष भरतशेठ येवले , यामधे कैलास हुलावळे , संतोष मोरे , जयवंत येवले , बाळासाहेब भानुसघरे , सुरेशभाऊ गायकवाड , बबनराव माने , वसंत माने , आशिश माने , संजय देवकर , संदिपशेठ देवकर , नंदकुमार पदमुले , कैलास येवले , आरूण भानुसघरे , संतोष कोँडभर , विजय तिकोणे , पोलिसपाटील संंजय जाधव , दत्ता ढाकोळ , काळुराम हुलावळे ,राजूशेठ देवकर , दिपक काशिकर , अभिषेक जाधव , वरसोलीचे सरपंच संजय खांडेभरड , औढोली चे माजी सरपंच साईनाथ मांडेकर , ताजेचे पोलिसपाटील अरूण केदारी , प्रवचनकार पांडुरंग गायकवाड , आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!