आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

मुळशी तालुक्यातील भुकूम या गावच्या सरपंचपदी मयुरी आमले तर उपसरपंचपदी अंकुश खाटपे यांची बिनविरोध निवड.

भुकूम गावाच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच सख्खे मावसभाऊ बहीण सरपंच आणि उपसरपंच झाल्याने नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

Spread the love
मुळशी तालुक्यातील भुकूम या गावच्या सरपंचपदी मयुरी आमले तर उपसरपंचपदी अंकुश खाटपे यांची बिनविरोध निवड.Mayuri became the sarpanch of Bhukum village in Mulshi taluk and Ankush Khatpe was elected unopposed as the deputy sarpanch.

आवाज न्यूज : मुळशी प्रतिनिधी, २५ एप्रिल.

नवनिर्वाचित सरपं मयुरी आमले ह्या उपसरपंच अंकुश खाटपे यांची बहीण असून आता भुकूम गावचा कारभार बहिण भावाकडे आला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील भुकूम ग्रामपंचायतचा कारभार इथून पुढे हे दोघे बहिण भाऊ एकत्र पाहणार आहेत.

मयुरी आमले आणि अंकुश खाटपे हे सख्खे मावस भाऊ बहीण आहेत. भुकूमच्या माजी सरपंच गौरी प्रसाद भरत वंश यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंच पदाची जागा रिकामी झाली होती.त्यानंतर मयुरी आमले यांची सरपंच पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपसरपंच पदी अंकुश खाटपे यांची यापूर्वीच निवड झाली होती.

दरम्यान भुकूम गावाच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच सख्खे मावसभाऊ बहीण सरपंच आणि उपसरपंच झाल्याने नागरिकांकडून कौतुक केले जात असून भुकूम ग्रामस्थांनी नवनियुक्त सरपंच आणि उपसरपंच यांची भुकुम गावठाण ते आंग्रेवाडी पर्यंत मिरवणूक काढली.तसेच गावचा कारभार आता महिलेच्या हाती आल्यामुळे गावच्या विकासाला मोठा हातभार लागेल अशी भावना देखील ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!