आपला जिल्हाराजकीय

युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी राजेश वाघोले यांची निवड.

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश टापरे यांनी रविवारी वाघोले यांना नियुक्तीचे पत्र दिले.

Spread the love

युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी राजेश वाघोले यांची निवड.Rajesh Vaghole’s post as Taluka President of Youth Congress.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २५ एप्रिल.

मावळ तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी दारुंब्रे येथील राजेश जगन्नाथ वाघोले यांची निवड करण्यात आली आहे.युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश टापरे यांनी रविवारी वाघोले यांना नियुक्तीचे पत्र दिले. या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, माजी युवक अध्यक्ष रोहिदास वाळूज, तालुका संपर्क प्रमुख राजू शिंदे, खंडुजी तिकोने, दिलीप ढमाले, अनंता लायगुडे, सोमनाथ कालेकर, असलम शेख, काळूराम बोडके उपस्थित होते. पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहणार राजेश वाघोले यांनी दारुंब्रे गावचे सरपंच म्हणून जबाबदारी सांभाळली.

 

 

कामाच्या जोरावर काँग्रेस श्रेष्ठींनी त्यांच्यावर तालुका युवक अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. युवक काँग्रेस अध्यक्षपदाच्या माध्यमातून तालुक्यातील युवकांना संघटीत करून पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे वाघोले यांनी सांगितले.

तालुकाध्यक्ष पदाबाबत तूर्त कार्यवाही सुरू असली तरी युवक अध्यक्ष मात्र नव्याने नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच, सद्यस्थितीत सुरू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसने घेतलेली भूमिका पाहता काँग्रेस पक्ष सक्रिय झाला असल्याचे चित्र मावळात पहायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!