आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणराजकीय

आठवड्यातून एक दिवस मावळ तालुक्यातील एका ऐतिहासिक ठिकाणी जावून स्वच्छता मोहीमेचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार : अप्पर पोलिसअधिक्षक मितेश घट्टे..

Spread the love

आठवड्यातून एक दिवस मावळ तालुक्यातील एका ऐतिहासिक ठिकाणी जावून स्वच्छता मोहीमेचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार: अप्पर पोलिसअधिक्षक मितेश घट्टे..A pilot project of cleanliness campaign will be implemented by going to a historic place in Maval taluka one day a week: Upper Superintendent of Police Mitesh Ghatte..

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, २७ एप्रिल.

आठवड्याला मावळ तालुक्यातील एका ऐतिहासिक ठिकाणी जावून स्वच्छता मोहीमेचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे,असे पुणेजिल्हा ग्रामिणचे अप्पर पोलिसअधिक्षक मितेश घट्टे म्हणाले.

वारसा स्वच्छतेचा मावळा शिवरायांचा या स्वच्छता अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या कार्लाच्या श्रीएकविरा देवी मंदिराचे परिसरात आणि कार्ला लेणी परिसरात, पाय-या व वाहनतळ याभागात स्वच्छता अभियान लोणावळा उपविभागीय पोलिसअधिक्षक कार्यालयाचे आयपीएस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्पनेतून ता.२६ रोजी राबविण्यात आली.याप्रसंगी श्री.घट्टे बोलत होते.

यावेळी शेकडो किलो प्लॕस्टीक , कचरा , रिकाम्या दारूच्या बाटल्या , पाण्याच्या बाटल्या तसेच खाद्यपदार्थ याचे पॕकींग चा कचरा येथे आढळून आलेला , सुमारे चारशे ते पाचशे स्वयंसेवक, पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, लोणावळा शहर , लोणावळा ग्रामिण , वडगाव , कामशेत आणि पवनानगर येथील पोलिस कर्मचारी यांनी सहभागी होऊन कचरा जमा करून मंदिराचे आवारासमोर पिशवीत जमा केला.

पञकार , वेहेरगावचे व दहिवलीचे , कार्लाचे ग्रामस्थ यांनी यामधे सहभाग घेतला.
यावेळी लोणावळा उपविभागीय पोलिसअधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी आधिकारी यांचेसह आई श्रीएकविरा चरणी दर्शन घेवून या मोहिमेस प्रारंभ केला.यावेळी सहाय्यक पोलिसअधिक्षक श्री. कार्तिक म्हणाले , मावळ परिसरात आनेक पुरातन अनेक पुरातन लेणी आहेत. लाखो पर्यटक गडकिल्ले , लेण्या , मंदिरात येत असतात .त्यांचे संवर्धन , जतन करणे व ते परिसर स्वच्छ ठेवणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.पुणेजिल्हा ग्रामिणचे वतीने वारसा स्वच्छतेचा ! मावळा शिवबाचा हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात सहभागी झालेल्या सर्वांचे मनापासून आभार, यावेळी लोणावळा ग्रामिणचे पोलिसनिरिक्षक किशोर धुमाळ , लोणावळा शहरचे पोलिस निरिक्षक सिताराम डुबल वडगाव चे पोलिस निरिक्षक विजयराव भोसले व कामशेतचे पोलिस निरिक्षक संजय जगताप आणि शेकडो पोलिस कर्मचारी पहाटे सहा ते दहा या वेळेत उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!