क्राईम न्युजमहाराष्ट्र

सिंहगड एक्सप्रेस मध्ये एका प्रवाशाला सात जणांच्या टोळक्याने लाथा बुक्क्याने तुडवला.

रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह लोणावळा पुणे व सीएसटी रेल्वे स्थानकावर केली तक्रारी दाखल..

Spread the love
सिंहगड एक्सप्रेस मध्ये एका प्रवाशाला सात जणांच्या टोळक्याने लाथा बुक्क्याने तुडवला.In Sinhagad Express, a passenger was trampled by a gang of seven people.रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह लोणावळा पुणे व सीएसटी रेल्वे स्थानकावर केली तक्रारी दाखल..

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, २७ एप्रिल.

सिंहगड एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या मावळातील एका प्रवाशाला लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे डब्यामधील सात जणांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह लोणावळा पुणे व सीएसटी रेल्वे स्थानकावर तक्रार देण्यात आली आहे.  संदीप सिद्राम गोंदेगावे (वय ३७, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी पुणे लोहमार्ग पोलिसांमध्ये सात जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. २५ एप्रिल रोजी सकाळी 7.15 वाजता संदीप गोंदेगावे हे लोणावळ्यातून सिंहगड एक्सप्रेस मध्ये बसले. लोणावळा (बोगी) डब्यामध्ये सीटवर बसण्यासाठी जागा असल्याने संदीप यांनी त्या ठिकाणी बसण्याचा प्रयत्न केला मात्र त्या सीटवर बसलेल्या एका प्रवाशांनी दोन जागा साहित्य ठेवून मित्रांसाठी राखून ठेवल्या होत्या. त्यावेळी संदीप यांनी एका जागेवर मला बसू द्या अशी विनंती केली असता सदर प्रवाशाने त्यांच्या खांद्यावरील बॅग धरून त्यांना ओढत डब्याच्या दुसऱ्या बाजूला घेऊन गेले. ह्या जागा आमच्या आहेत, येथे तुला बसता येणार नाही अशा प्रकारचे दमदाटी करून मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी त्या प्रवाशाचे सहकारी असणारे इतर सहा जणांनी देखील त्यामध्ये सहभाग घेत संदीप यांना हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये संदीप यांच्या डोळ्याला मार लागला आहे. तसेच त्यांच्या नाकातून रक्त येऊ लागल्याने व डब्यामधील अन्य काही प्रवाशांनी सदर भांडण सोडवल्याने संदीप यांचा खरंतर जीव वाचला.

सिंहगड एक्सप्रेस मध्ये मागील महिनाभरामध्ये प्रवाशांना मारहाण करण्याची ही पाचवी घटना आहे. सिंहगड एक्सप्रेस मधील सदरची बोगी ही सर्व प्रवाशांसाठी असताना काही रेल्वेचे कर्मचारी व या गाडीमधून दैनंदिन प्रवास करणारे काही प्रवासी हे डब्यामध्ये हुकूमशाही पद्धतीने वागत नवीन येणाऱ्या प्रवाशांना मारहाण करतात. दमदाटी करतात, सीटवर बसून देत नाहीत हे प्रकार वारंवार घडत आहेत. ही बोगी आमची पास धारकांची आहे, आम्ही रोजचे प्रवासी आहोत अशी कारणे ते देतात. खरंतर रेल्वे ही सर्वसामान्यांची आहे व त्यामधून सर्वांना प्रवास करून देणे ही नैतिक जबाबदारी असताना काही प्रवासी जाणीवपूर्वक इतर प्रवाशांना त्रास देत आहे. रेल्वे पोलीस प्रशासन व रेल्वे मंत्रालयाने या बाबींची गांभीर्यपूर्वक दखल घेत अशा मुजोर प्रवासी व पास धारक कर्मचारी यांच्यावर सक्त कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!