आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र

आंतरशालेय रायन फुटबॉल जिल्हास्तरीय लीग स्पर्धेत माउंट सेंट ॲन्स स्कूलला सर्वसाधारण विजेतेपद.

Spread the love

आंतरशालेय रायन फुटबॉल जिल्हास्तरीय लीग स्पर्धेत माउंट सेंट ॲन्स स्कूलला सर्वसाधारण विजेतेपद.Mt St Anne’s School overall champion in Inter-School Ryan Football District Level League Tournament.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर २८ एप्रिल.

तळेगाव दाभाडे: आंतरशालेय रायन फुटबॉल जिल्हास्तरीय लीग स्पर्धेतील सहा पैकी तीन गटात विजेतेपद मिळवत येथील माउंट सेंट ॲन्स स्कूलने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. १४ वर्षे मुलांच्या वयोगटात शांक मायटी याने तर मुलींच्या वयोगटात आंचल मोरे यांनी बेस्ट प्लेअर्सचा किताब मिळवला.

अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आणि पुणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने येथील
नूतन इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत २३ शालेय संघांच्या २५३ बाल व कुमार खेळाडूंनी भाग घेतला.
ब्लुमिंग इंटरनॅशनल स्कूलचे विश्वस्त साहेबराव बोडके आणि रायन स्पोर्ट्स अकॅडमीच्या सचिव मार्गारेट स्वामी यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. पंच म्हणून
राष्ट्रीय फुटबॉल पटू मनोज स्वामी, विजयकुमार चिन्नया, अलिवन मकासरे, शाबीर सय्यद, वैभव मालुसरे, घन:श्याम राणा, सिद्धार्थ शिंदे आणि लान मार्टिन यांनी काम पाहिले.

 

स्पर्धेचा निकाल याप्रमाणे:
गट अ – १४ वर्षे मुले:
विजेता-पोदार इंटरनॅशनल स्कूल, वडगाव मावळ,
उपविजेता- माउंट सेंट ॲन्स स्कूल,तळेगाव दाभाडे
गट अ -१४ वर्षे मुली: विजेता- ब्लूमिंग स्कूल, गहुंजे, उपविजेता – माउंट सेंट ॲन्स स्कूल
गट ब- १२ वर्षे मुले: विजेता- माउंट सेंट ॲन्स स्कूल
उपविजेता- पोदार स्कूल
गट क- १० वर्षे मुले: विजेता- माउंट सेंट
ॲन्स स्कूल. उपविजेता- ब्लूमिंग स्कूल.
गट ड – ८ वर्षे मुले: विजेता- माउंट सेंट ॲन्स स्कूल. उपविजेता- ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल.
गट इ -६ वर्षे मुले:
विजेता-पोदार स्कूल.
उपविजेता- ब्लूमिंग स्कूल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!