आपला जिल्हाकृषीवार्ताक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र

संतोष भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन मावळच्या वतीने भव्य २०-२० बैलगाडा शर्यतीचे आयोजन….

अजितदादा पवार विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य विधानसभा, महाराष्ट्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व गाडामालक, गाडाशौकीन, व मान्यवरांनी उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येत आहे.

Spread the love

संतोष भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन मावळच्या वतीने भव्य २०-२० बैलगाडा शर्यतीचे आयोजन….Organized grand 20-20 bullock cart race on behalf of Santosh Bhegde Sports Foundation Maval….

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी २८ एप्रिल.

भिर्रर्रर्रर्र झाली रे.
नाद पुन्हा घुमणार .
श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे आधारस्तंभ, पीएमआरडीएचे सदस्य, माजी नगरसेवक संतोष छबुराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि. ३०) सकाळी पुणे जिल्हा केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. मावळ तालुक्यातील नाणोली येथील हिंदकेसरी घाटात ही स्पर्धा होणार आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार, युवा नेते पार्थ पवार, आमदार सुनील शेळके, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी मंत्री मदन बाफना, बाळा भेगडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, माऊली दाभाडे, खासदार श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दत्तात्रय भरणे, अण्णा बनसोडे, रवींद्र धंगेकर, महेशलांडगे, अतुल बेनके, निलेश लंके, चेतन तुपे, अशोक पवार, सुनील टिंगरे, दिलीप मोहिते पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबुराव वायकर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक नाना काटे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल आदी मान्यवर यावेळी उपस्थिती राहणार आहेत.तळेगाव येथील श्री डोळसनाथ महाराज मंदिरात गुरुवारी सकाळी लकी ड्रॉ पद्धतीने टोकण देण्यात आले, अशी माहिती संतोषभाऊ भेगडे स्पोर्टस फाउंडेशनच्या संयोजकांनी दिली.

प्रथम क्रमांकास एक लाख ११ हजार १११ रुपये, द्वितीय क्रमांकास एक लाख रुपये, फळी फोड गाड्यास कुट्टी मशीन, घाटाच्या राजास भव्य चषक, पुणे जिल्हा केसरी चांदीची गदा आणि मेगा फायनलसाठी दुचाकी अशी लाखोंची बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते दिली जाणार असल्याचे संतोष भेगडे यांनी सांगितले.

  सर्व गाडामालक, गाडाशौकीन, व मान्यवरांनी उपस्थित राहूनकार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती.आयोजक, नगरसेवक संतोष भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन – मावळ यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!