आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीला मिळाल्या सतरा जागा भाजपला एका जागेवर मानावे लागले समाधान..

आमदार सुनील शेळके यांचा दावा खरा ठरला. विकास कामांच्या जोरावरच जनतेचा विश्वास प्राप्त केला.

Spread the love

कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीला मिळाल्या सतरा जागा भाजपला एका जागेवर मानावे लागले समाधान..NCP got seventeen seats on Agricultural Produce Market Committee, BJP had to settle for one seat.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २९ एप्रिल.


मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक काल पार पडली. आज झालेल्या मतमोजणीत बाजार समितीवर राष्ट्रवादी प्रणित मविआ पॅनलने १८ पैकी १७ जागांवर दणदणीत विजय मिळविला. तर भाजपला अवघी एक जागा मिळाली. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपरिषद व महानगरपालिका निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. याच निवडणुकीवर आगामी काळातील निवडणुकीचे भविष्य ठरेल असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला.

१) कृषि पंतसंस्था मतदारसंघात सर्वसाधारण (७ जागा) एकूण 643 मते अवैध 48 मते 1) दिलीप नामदेव ढोरे (351), २) संभाजी आनंदराव शिंदे (343), ३) सुभाष रघुनाथ जाधव (350), ४) विलास सदाशिव मालपोटे (375), ५) बंडू दामू घोजगे (353),६)मारुती नाथा वाळुंज(340), ७) साईनाथ दत्तात्रय मांडेकर (350), ८) शत्रुघ्न रामभाऊ धनवे (219), ९) निलेश विष्णू मराठे (233),१०) बंडू तुकाराम कदम (225), ११) सुभाष रामभाऊ देशमुख (230)१२) विशाल बबनराव भांगरे (230),१३) प्रसाद प्रकाश हुलावळे (238), १४) खंडू बाळाजी तिकोने (217), १५) सुनील तानाजी दाभाडे (002)

२) कृषि पतसंस्था महिला एकूण 643 मते अवैध 20 मते 1) सुप्रिया अनिल मालपोटे (370), 2) अंजली गोरख जांभुळकर (368), 3) कांचन सुभाष धामणकर (216), नंदाताई देवराम सातकर (256)

३) कृषि पतसंस्था ओबीसी अवैध मते 20, 1) शिवाजी चिंधु असवले(366), 2) एकनाथ नामदेव पोटफोडे (257),

४) कृषि पतसंस्था वि ज / विमुक्त जाती जमाती अवैध 33, (1 जागा) 1) नथु शंकर वाघमारे (371), जितेंद्र काशिनाथ परदेशी (10),शरद परशूराम साळुंखे (229)

५) ग्रामपंचायत सर्वसाधारण(2 जागा)एकूण मतदान 836 अवैध 21 मते,1) नामदेव नानाभाऊ शेलार (426),2) विक्रम प्रकाश कलवडे (456), योगेश गजानन राक्षे (399), शिवराम मारुती शिंदे (320)

६) ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती अवैध 19 मते (1 जागा) विलास बबन मानकर (424), अंकुश ज्ञानदेव सोनवणे (393),

७) ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल अवैध 25 मते, (1 जागा) अमोल अरुण मोकाशी (497), अस्लम जमील शेख (314)

८) व्यापारी व आडते (2 जागा ) एकूण मते 101 अवैध मत 1

1) नामदेव ज्ञानेश्वर कोंडे (48),
2) भरत दशरथ टकले(50)
3) महेंद्र छगनलाल ओसवाल (39),
4) प्रकाश रामभाऊ देशमुख (36),
5) परशुराम कंकाराम मालपोटे (08),
6)नवनाथ पांडुरंग हारपुडे (16)

९) हमाल तोलारी (1 जागा) एकूण मते 10 सर्व मते वैध

1) शंकर अंतू वाजे (8),
2) हनुमंत ईश्वर मराठे (2)
मावळचे तहसीलदार निवडणूक निरीक्षक विक्रम देशमुख,निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक (Maval) शिवाजी घुले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र नेहुल, मतमोजणी अधिकारी अशोक मारणे, प्रवीण धमाल, जितेंद्र विटकर, गंगाधर कोत्तावार, पोलीस निरीक्षक विलास भोसले व सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव पोलीस अंमलदार संजय सुपे, सुनील जावळे, शशिकांत खोपडे व बहुसंख्य पोलीस अंमलदारांनी निवडणूक शांततेत उत्तम नियोजनात पारदर्शक पद्धतीने मतमोजणी करून निकाल घोषित केला.

भाजप प्रणित छत्रपती शिवाजी महाराज सर्व पक्षीय सहकार परिवर्तन पॅनलला १८ जागांपैकी व्यापारी आडते मतदार संघात नामदेव ज्ञानेश्वर कोंडे विजयी झाले. भाजपला १८ पैकी एकच जागा मिळाली.भाजपला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आगामी काळात होणाऱ्या पंचायत समिती,जिल्हा परिषद,नगरपंचायत, नगरपरिषद व महानगरपालिका निवडणुकात भाजपचे चित्र काय राहणार हे मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे.

आमदार सुनील शेळके यांचा दावा खरा ठरला. विकास कामांच्या जोरावरच जनतेचा विश्वास प्राप्त केला. या निवडणुकीत १८ पैकी १७ जागा राष्ट्रवादी प्रणित मविआ पॅनलला मिळाल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा जल्लोष व उत्साह वाढला. निवडणुकीत विजय प्राप्त झाल्याने मावळ पंचायत समिती ते ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!