आपला जिल्हाकृषीवार्तासामाजिक

शर्यतीच्या माध्यमातून आजही आपली संस्कृती जिवंत ठेवणाऱ्या बैलगाडा मालकांना मी सॅल्यूट करतो.अजित पवार विरोधी पक्षनेते.

माजी नगरसेवक संतोष भेगडे यांनी आयोजित केलेल्या बैलगाडा स्पर्धेमध्ये राज्यभरातून १७० बैलगाडा सहभागी झाले होते.

Spread the love

शर्यतीच्या माध्यमातून आजही आपली संस्कृती जिवंत ठेवणाऱ्या बैलगाडा मालकांना मी सॅल्यूट करतो, अशा शब्दांत विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बैलगाडा मालकांचे कौतुक केले.Leader of Opposition in Legislative Assembly Ajit Pawar praised the bullock cart owners in these words, I salute the bullock cart owners who keep their culture alive through the race.

आवाज न्यूज: मावळ प्रतिनिधी,१ मे.

 

संतोष छबुराव भेगडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नगरसेवक संतोष भेगडे स्पोर्टस फाउंडेशन मावळ व समस्त ग्रामस्थ नानोली यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हा केसरी भव्य निमंत्रित २०-२० बैलगाडा शर्यतीचे आयोजन रविवारी (दि. ३०) करण्यात आले होते.संतोष भेगडे यांनी आयोजित केलेल्या बैलगाडा स्पर्धेमध्ये राज्यभरातून १७० बैलगाडा सहभागी झाले होते. यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके, माजी नगरसेवक तथा विद्यमान सदस्य महानगर नियोजन समितीचे संतोष भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, गणेश खांडगे, विठ्ठलराव शिंदे, साहेबराव कारके, सुभाष जाधव, बाबुराव वायकर, संतोष मुन्हे, दत्तात्रय पडवळ, चंद्रजीत वाघमारे, नाणोलीच्या सरपंच भूमिका शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पवार म्हणाले की, बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी संतोष भेगडे व आमदार सुनील शेळके यांनी वारंवार माझ्याकडे पाठपुरावा केला. राज्य सरकार,
केंद्र सरकारच्या माध्यमातून बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी सर्वांनीच शर्तीचे प्रयत्न केले. बैलगाडा शर्यतीचा प्रश्न सुटल्यापासून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत आहे. बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणेही फिटत आहे.

 

यात्रा, जत्रा, उत्सव काळात बैलगाडा शर्यत सुरू ठेवल्याबद्दल बैलगाडा मालकांचे यावेळी पवार यांनी आभार मानले. अलीकडच्या काळात यांत्रिकीकरण झाल्यामुळे शेतीची कामे बैलांऐवजी ट्रॅक्टर द्वारा होत आहेत. परंतु बैल हा शेतकऱ्यांचा मित्र असल्याने त्याची चागल्या प्रकारे जोपासना करून यात्रेमध्ये उरुसाच्या निमित्ताने बैलगाडा शर्यती उत्साहात होत
आहेत.

यावेळी स्वागत व प्रास्ताविक संतोष भेगडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!