आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सहा ते सात वर्षापासून पगार थकल्याने सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी , कुसगाव बुद्रूक येथे आज ता.२ पासून कामगारांचे बेमुदत उपोषण सुरू…

उपोषणकर्ते हातात घोषणाफलक घेवून आक्रमक:आरोग्य कर्मचारी उपोषणस्थळी उपस्थित..

Spread the love

सहा ते सात वर्षापासून पगार थकल्याने सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी , कुसगाव बुद्रूक येथे आज ता.२ पासून कामगारांचे बेमुदत उपोषण सुरू ; उपोषणकर्ते हातात घोषणाफलक घेवून आक्रमक:आरोग्य कर्मचारी उपोषणस्थळी उपस्थित..

आवाज न्यूज मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी २ मे.

सात वर्षापासून पगार थकल्याने सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी , कुसगाव बुद्रूक येथे आज ता.२ पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. २०१७ पासून २०२३ पर्यत वेतन थकल्याने ८१ सफाई कामगारांपैकी पंधरा कर्मचारी उपोषणास बसलेले आहेत .बाकीचे पाठिंबा देण्यासाठी उपोषण करत आहे.

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक अध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले असून त्याच्या प्रती संकुल संचालक , सिंहगड इन्स्टिट्यूट , स्थावर व्यवस्थापक , जिल्हाधिकारी साहेब , उपविभागीय पोलिस अधिकारी , तहसिलदार , लोणावळा ग्रामिणचे पोलिसनिरिक्षक , पोलिसअधिक्षक , पुणे , व कामगार आयुक्त , यांना निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत.सहा ते सात वर्षापासून वेतन थकल्याने सुमारे ८१ चेवर महिला व पुरूष सफाई कामगारांनी आंदोलनाचा पविञा घेतला आहे. त्यातील १) अतुल बोरकर ,२)गणेश काळे ,३),गणेश चव्हाण ,४)संतोष पिंजण ,५)आशोक घोडेराव,६)दिनेश साळवे ,७)दिपक तळेकर,८)लक्ष्मी पाठारे ,९)नंदा साळवे१०)शैलाताई गरवड ,११)आलका भोसले ,१२)सुलाबाई कडू ,१३)सुगंधा कडू ,१४)सुरेखा निंबळे ,१५) सुनिता शिँदे या सफाई कामगारांचा यांमध्ये समावेश आहे.

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी या कँपस मधे सुमारे अनेक विद्याशाखा मधे हजारो विद्यार्थी व विद्यार्थीनी गेली वीस बावीस वर्षापासून शिक्षण घेत आहेत. शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी येथे नोकरी करत आहेत. काही महिन्यापूर्वी शिक्षकांनी उपोषण करून वेतन मिळवले .त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यास आज आतील कुणी नाही, असे काही कामगारांनी आवाज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले .
येथील शिक्षण संस्थेत डोनेशन ,वार्षिक फी , च्या रूपाने कोट्यावधी रूपयेची उलाढाल येथे होत आहे. सुमारे पंचवीस ते तीस लहान मोठी दुकाने , लहान मोठ्या हाॕटेलचा व्यवसाय चालतो.पन्नास साठ रिक्षा यांची रोज ये जा आसते.
अशा या एज्युकेशन सोसायटी ची रस्ते , परिसर , आणि शाळा , महाविद्यालयाचे तसेच होस्टेलचे रूमची रोजची साफसफाई या सुमारे शंभरचेवर सफाई कर्मचारी , शिपाई यांचेकडून केली जात आहे.

निवेदनामधे म्हटले आहे की , आमचे थकीत पगार वर्षे २०१७-१८,२०१८-१९,,२०२०-२१,२०२१-२२ आणि २०२२-२३ सदर चालु वर्षातील थकीत पगार आहेत.वारंवार याबाबतीत आपणास बोलून अथवा लेखी स्वरूपात निवेदन देवूनही आम्हास पगार मिळालेला नाही. आपल्यासोबत बोलून याबाबतीत चर्चा केली असता , आम्हास चर्चेअंती थकीत पगार व चालू पगार देवू , आसे अश्वासन दिले , परंतु दिलेल्या तारखेस तुम्ही कुणाचेही पगार दिलेले नाही.तुम्ही आम्हास प्रत्येक वेळेस उडवाउडवीची उत्तरे दिली आहे.हा प्रकार गेली सहा ते सात वर्से चालू आसल्यामुळे. व आम्हास या प्रकारामुळे अत्यंत मानसिक व शारिरिक ञास सहन करावा लागत आहे.आमचे कर्मचारी वर्ग यांचेवर उपासमार व कर्जबाजारी झाले आहे.

पगार नियमित न मिळाल्यामुळे सर्वांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.आमच्यावर जीव देण्याची वेळ आली आहे.आम्हा कर्मचा-यांचे भविष्यात कुणाचे काही बरेवाईट झाल्यास यास सर्वस्वी आपली संस्था जबाबदार असेल ,
आम्ही आपणास ता.१० मार्च व १० एप्रिल २०२३ रोजी ननिवेदन दिले होते.
परंतु आम्हास आद्यापपर्यत थकीत या निवेदनाचे प्रत्यक्ष उत्तर मिळालेले नाही.पगारही झाला नाही , म्हणून आम्ही आजपासून काम बंद करण्याचा निर्णय घेत आहोत.
सिंहगड एज्युकेशन टेक्निकल सोसायटी चे मुख्य गेटवर उपोषणास प्रत्यक्ष पंधरा सफाई कामगार बेमुदत उपोषणास बसले आसून त्यांना ८१ मधील सर्व कायगारांचा पाठिंबा आहे.
उपोषणाचे ठिकाणी आद्याप कोणतेही राजकीय पक्ष ,संघटना , कामगार संघटना यांचे प्रतिनिधी आलेले नाही.काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष डाॕ.किरणशेठ गायकवाड यांनी उपोषणकर्ते यांची भेट घेतली व पाठिंबा दिला.तसेच सुमारे २७० चेवर लोकांनी येथे पाठिंबा दिल्याचे उपोषणकर्ते म्हणाले.प्रत्यक्ष उपोषणास बसणारे सफाई कामगार यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी सिंहगड इन्स्टिट्यूट टेक्निकल सोसायटी मधील श्रीमती काशिबाई नवले हाॕस्पिटलचे डाॕक्टर व परिचारिका तसेच कार्लाच्या आरोग्य केँद्राच्या परिचारिका यांनी हजेरी लावली.
येथे
सन २०१९-२० या कोविड१९ चे कोरोनाच्या कठीण काळातही येथील सर्व सफाई कर्मचारी यांनी वेतनात काटछाट होऊनही कुरकूर न करता कसाबसा संसाराचा गाडा हाकला , पण आता कोरोनाचा काळ संपला. सिंहगड चे व्यवस्थापकांनी पूर्ण वेतन व मागील थकीत वेतनही द्यावे , आणि संसाराला हातभार लावावा , आशीच मागणी गेली सहा महिने कामगार करीत आहे.प्रशासनाने न ऐकल्याने ता.२ पासून सर्व महिला व पुरूष कामगार बेमुदत , आमरण उपोषणाला बसले आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!