आपला जिल्हाकृषीवार्तासामाजिक

धायरी गावातील शेतकऱ्यांनी केले गोदान…! 

दिनांक ३०/०४/२०२३ रोजी मिलिंद  एकबोटे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत धायरी या गावातील  शेतकरी बंधू  संग्राम लायगुडे यांनी ०१ खिल्लार गाई, शेतकऱ्यांनी गोरक्षकांशी संपर्क साधून गोवंश गोशाळेत पाठवण्याची इच्छा व्यक्त केली...

Spread the love

धायरी गावातील शेतकऱ्यांनी केले गोदान…! 

The farmers of Dhairi village did Godan…! 

आवाज न्यूज : प्रतिनिधी, २ मे..

दिनांक ३०/०४/२०२३ रोजी मिलिंद  एकबोटे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत धायरी या गावातील  शेतकरी बंधू  संग्राम लायगुडे यांनी ०१ खिल्लार गाई, शेतकऱ्यांनी गोरक्षकांशी संपर्क साधून गोवंश गोशाळेत पाठवण्याची इच्छा व्यक्त केली.

अखिल भारत कृषी गोसेवा संघाच्या माध्यमातून गोशाळेत चांगल्या प्रकारे मरेपर्यंत सांभाळ होईल असा विश्वास शेतकऱ्यांना यावेळी दर्शवला.अखिल भारत कृषी गोसेवा संघाच्या आवाहनामुळे आम्हाला गोवंश कत्तलीसाठी न देता गो शाळेत सोडण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिला… शेतकऱ्यांनी आम्हाला एकही रुपया नको फक्त गोवंशाचा मरेपर्यंत व्यवस्थित सांभाळ व्हावा अशा शब्दात आपले गोप्रेम यावेळी व्यक्त केले…! गोवंश सुखरूप श्री विरालयम गोशाळा, जांभूळवाडी येथे सोडण्यात आले.

 

या गोदानासाठी अनिकेत जागडे, रामभाऊ गायकवाड, उपेंद्र बलकवडे पुणे जिल्हाध्यक्ष तसेच यश बावरिया यांची साथ लाभली…. ! ह्या बातमीच्या माध्यमातून पुन्हा एकदा मिलिंद भाऊ एकबोटे यांच्यातर्फे आवाहन करण्यात येत आहे की कोणत्याही शेतकरी बांधवांना गोवंश कत्तलीसाठी न देता गो शाळेत सांभाळ करण्यासाठी द्यायच्या असेल तर अखिल भारत कृषी गोसेवा संघ यांच्या शी संपर्क साधावा अशी विनंती करण्यात येत आहे.

तुंम्ही आम्हाला प्रतिदिन एक रुपया द्या आम्ही तुम्हाला गोहत्या मुक्त हिंदुस्तान देऊ ! बजरंग दल आखिल भारत कृषी गो सेवा संघ 9766433786

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!