आपला जिल्हाकृषीवार्ताक्रीडा व मनोरंजन

पुणे जिल्हाकेसरी बैलगाडा शर्यतीत ४४ बैलगाडा प्रथम क्रमांकात..

PMRDA सदस्य संतोष भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त केलें होतें आयोजन.

Spread the love

पुणे जिल्हाकेसरी बैलगाडा शर्यतीत ४४ बैलगाडा प्रथम क्रमांकात..
PMRDA सदस्य संतोष भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त केलें होतें आयोजन.Pune District Kesari Bullock Cart Race 44 Bullock Carts First Rank..It was organized on the birthday of PMRDA member Santosh Bhegde.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ३ मे.

तळेगाव दाभाडे: २०-२० पुणे जिल्हाकेसरी बैलगाडा शर्यतीत ४४ बैलगाडा प्रथम क्रमांकात तर १०५ बैलगाडा द्वितीय क्रमांकात आले. या स्पर्धेत एकूण १७० बैलगाडे धावले. स्पर्धेच्या फायनल मध्ये ३७ गाडामालकांनी सहभाग नोंदविला.

पुणे महानगर नियोजन समिती सदस्य, त. दा. न. प. मा. नगरसेवक, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे मा.उपाध्यक्ष संतोष छबुराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्य निमंत्रित २०-२० पुणे जिल्हा केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दिनांक ३० एप्रिल रोजी हिंदकेसरी घाट, नाणोली, ता.मावळ येथे संपन्न झाली.या बैलगाडा शर्यतीसाठी पुणे जिल्ह्यातील अनेक नामांकित बैलगाडा मालकांना निमंत्रित केले होते. या शर्यतीत एकूण १७० बैलगाडे धावले. त्यापैकी ४४ बैलगाडा प्रथम क्रमांकात तर १०५ बैलगाडा द्वितीय क्रमांकात आले. बक्षिसाची रक्कम सर्वांना विभागून देण्यात आली.

प्रथम क्रमांकासाठी १,११,१११ /- आणि
द्वितीय क्रमांकासाठी १,००,०००/- राख बक्षीस तर मेगा फायनल साठी १० दुचाकी गाड्यांचे भव्य बक्षीस जाहीर करण्यात आले होते.स्पर्धेदरम्यान एकूण ३७ गाडामालकांनी फायनल मध्ये सहभाग नोंदवला. फायनलची बक्षीसे ही विभागून देण्यात आली. या बैलगाडा शर्यतीचा निकाल खालील प्रमाणे

घाटाचा राजा (११.२३ सेकंद) – भव्य चषक – दत्तूशेठ कोंडीबा मळेकर (चिखली – ता.हवेली )
प्रथम क्रमांक फळीफोड – कुट्टी मशीन – स्वप्नील बाळासाहेब जगताप (नाणोली मावळ)
द्वितीय क्रमांक फळीफोड – कुट्टी मशीन – विठ्ठल बबन पानमंद ( शिंदे वासुली – खेड)
पहिला क्रमांक – बुलेट – १)दत्तू कोंडीबा मळेकर २)बाळासाहेब गणपत साकोरे 3)राहुलशेठ महादेव गोरे ४) विशाल लोंढे विभागुन
दुसरा क्रमांक – होंडा शाईन – १) राजूशेठ जवळेकर २)संतोष गावडे 3)चेतन रामदास भेगडे ४) ज्ञानेश्वर चव्हाण विभागुन
तिसरा क्रमांक – हिरो स्प्लेंडर – १)नितीन आप्पा काळजे २)बबन चव्हाण 3) नवनाथ शेटे ४) मयूर टेमगिरे विभागुन
चतुर्थ क्रमांक – हिरो सी.डी.डॉन – १) निलेश लोखंडे २)ब्रिजेश धुमाळ 3)संभाजी आप्पा भेगडे ४) रामनाथ शेठ वारिंगे विभागुन
पाचवा क्रमांक – हिरो सी.डी.डॉन – १) मयूर हॉटेल २) नारायण मोरे 3) स्वप्नील जगताप ४) विकास वाडेकर विभागुन
सहावा क्रमांक – हिरो सी.डी.डॉन – १)गणपतराव मुळूक २)भगवान शेठ गावडे 3) लक्ष्मण खांदवे ४)चेतन भीमाशंकर बोडके विभागुन
सातवा क्रमांक – हिरो सी.डी.डॉन – १) सहादूमामा काळोखे २)साहिल कांचन मुऱ्हे 3)शिवतेज काळोखे ४)संतोष मांडेकर विभागुन
आठवा क्रमांक – हिरो सी.डी.डॉन – १) विघ्णेश दाभाडे २)विक्रम बोत्रे 3) विघ्णेश जाधव ४)रामशेठ भाडळे विभागुन
नववा क्रमांक – हिरो सी.डी.डॉन – १) राहुलदादा जाधव २)राजवीर शितोळे 3)दामुशेठ लांडगे ४)गणेश नाना आरगडे विभागुन
दहावा क्रमांक – हिरो सी.डी.डॉन – १) मारुती पांडुरंग कदम
तर ट्रॅक्टर हा तीन वर्षे प्रथम येणाऱ्या गाड्यास आहे.
बैलगाडा शर्यतीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील, मावळचे आमदार सुनील शेळके, पी.डी.सी.सी बँकेचे मा.अध्यक्ष बबनराव भेगडे, रा. कॉ. चे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, विठ्ठलराव शिंदे, बाबुराव वायकर, युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, आयोजक संतोष भेगडे व तालुक्यातील अनेक मान्यवर, बैलगाडा मालक, बैलगाडा शौकीन व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैलगाडा घाटात सर्वाना बसण्यासाठी मांडवाची व्यवस्था, जेवण व पाण्याची व्यवस्था तसेच बैलांसाठी निवारा शेड व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच जनावरांसाठी पशु वैद्यकीय अधिकारी आणि नागरिकांसाठी डॉक्टर व रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती.
बैलगाडा शर्यतीचे नियोजन करण्यासाठी नगरसेवक संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फौंडेशन, मावळ चे कार्यकर्ते तसेच हिंदकेसरी घड्याळ मास्तर दिनकर (बाळा) भेगडे, कौस्तुभ भेगडे , चेतन भेगडे, अमित भसे, सिद्धेश भेगडे, अनिकेत वाघोले, गणेश माळी, जीवन भेगडे, धनराज माने, अक्षय रानवडे, समस्थ नाणोली ग्रामस्थ, अखिल भारतीय बैलगाडा संघटना, श्री डोळसनाथ महाराज बैलगाडा संघटना यांचे सहकार्य लाभले.

बैलगाडा जुंपण्यासाठी श्री डोळसनाथ महाराज बैलगाडा संघटना (तळेगाव दाभाडे), सहकार्य ग्रुप (मावळ तालुका), काळभैरवनाथ बैलगाडा संघटना (आंबी), समृद्धी ग्रुप (नवलाख उंबरे) यांचे विशेष सहकार्य लाभले.
स्वागत व प्रास्ताविक संतोष भेगडे (PMRDA सदस्य, नगरसेवक) यांनी केले व सूत्र संचालन अतुल राऊत आणि प्रवीण मुऱ्हे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!