आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

॥ पुस्तक प्रकाशन सोहळा ||

“कला कलावंत आणि डॉ.बाबासाहेब या ग्रंथ प्रकाशनाचा सोहळा..

Spread the love

पुस्तक प्रकाशन सोहळा “कला कलावंत आणि डॉ.बाबासाहेब या ग्रंथ प्रकाशनाचा सोहळा.Book Release Ceremony “Kala Kalawant and Dr.Babasaheb book release ceremony.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर,३ मे.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील रसिकता, संगित, नाट्य व सौंदर्यशास्त्र या अप्रकाशित पैलुवर प्रकाश टाकणारे लेखक प्रभाकर ओव्हाळ यांच्या लेखणीतून साकारलेल्या कला-कलावंत आणि डॉ. बाबासाहेब या ग्रंथ प्रकाशनाचा सोहळा आयोजित केला असून या सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

उत्तमजी कांबळे, सुप्रसिध्द व्याख्याते ज्येष्ठ पत्रकार व मा.आय ८४ अ. भा. साहित्य संमेलन यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.

विश्वास पाटील, डॉ.प्रा.गणेशजी चंदनशिवे, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण महर्षी कृष्णरावजी भेगडे. असणार आहे.

नुतन विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त. रामदासजी काकडे. सुरेशजी साखवळकर. संपादक साप्ताहिक अंबर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत .

सुरेश धोंडिबा धोत्रे. मा.. नगराध्यक्ष व ॲड. रंजना भोसले मा. नगराध्यक्षा. यांनी निमंत्रित केले आहे.दि. ४ मे २०१३ रोजी सायं. ६.०० वाजता.विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक अल्टिनो कॉलनी तळेगाव स्टेशन.येथे कार्यक्रम होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!