क्रीडा व मनोरंजन

ठाकरे क्रीडा संकुलाच्या स्केटिंग खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड

Spread the love

मुंबई : अहमदाबाद येथे होणाऱ्या ३६व्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी विलेपार्ले (पूर्व) येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या काही खेळाडूंची निवड झाली आहे. त्यामध्ये टिया नरोन्हा, हिर सुरती, तत्विद खैरवार, याश्वी शहा, स्नेहा आनंद, राहुल एलुरी, रिवा अग्रवाल यांचा समावेश आहे. महाराष्ट्र स्केटिंग संघाचे अध्यक्ष आदेश सिंग यांचे मोलाचे सहकार्य खेळाडूंना मिळत आहे. निवड झालेल्या खेळाडूंचे खास अभिनंदन संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!