आपला जिल्हाकृषीवार्ता

फ्रेंड्स ऑफ नेचरच्या वतीने बोर्गवार्नर कंपनीतील कंपनीत चिमणी घरट्यांचे वितरण ..

फ्रेंड्स ऑफ नेचरच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील उपक्रम ....

Spread the love

फ्रेंड्स ऑफ नेचरच्या वतीने बोर्गवार्नर कंपनीतील कंपनीत चिमणी घरट्यांचे वितरण ..फ्रेंड्स ऑफ नेचरच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील उपक्रम ..Distribution of Chimney Nests in Borgwarner Company on behalf of Friends of Nature ..Activities in Silver Jubilee Year of Friends of Nature ..

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे वार्ताहर ६ मे.

बोर्गवार्नर या अमेरिकन कंपनी मधे फ्रेंड्स ऑफ नेचरच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील उपक्रमांतर्गत फ्रेंड्स ऑफ नेचरच्या माध्यमातून सभोवतालचे पक्षी या विषयावर माहितीपर कार्यक्रम घेतला व ईच्छुक ५० कामगारांना चिमणी घरटी भेट दिली.

फ्रेंड्स ऑफ नेचरचे संस्थापक अध्यक्ष महेश महाजन यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना फ्रेंड्स ऑफ नेचरच्या कार्याविषयी माहिती दिली आणि सभोवतालचे पक्षी या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान दिले.

चिमण्याच्या घरट्यांच्या वापराविषयी मार्गदर्शन करण्यात आले आणि विविध शंकांचे निरसन करण्यात आले.
या प्रसंगी फ्रेंड्स ऑफ नेचरचे जेष्ठ सदस्य विश्वास देशपांडे, बोर्गवार्नर कंपनीचे एच.आर. हेड.माने, ॲड्मीन विभाग प्रमुख मंदार डोळे तसेच अधिकारी वर्ग व कर्मचारी उपस्थित होते.

ॲड्मीन विभाग प्रमुख मंदार डोळे यांनी या उपक्रमात कंपनीला सहभागी केल्या बद्दल फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेचे आभार मानले व फ्रेंड्स ऑफ नेचरच्या विविध उपक्रमात कंपनीच्या वतीने सहभाग घेण्याची ईच्छा प्रकट केली.
कार्यक्रम अतिशय ऊत्साही वातावरणात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!