आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजन

कलापिनी स्वास्थ्ययोगाचा १९ वा वर्धापनदिन दिमाखात साजरा !

वाढत्या वयाची चिंता नको…..माधव कुलकर्णी.

Spread the love

कलापिनी स्वास्थ्ययोगाचा १९ वा वर्धापनदिन दिमाखात साजरा !वाढत्या वयाची चिंता नको…..माधव कुलकर्णी.Celebrating Kalapini Swasthyayoga’s 19th Anniversary in Dimakha!” Don’t worry about growing old…..Madhav Kulkarni.

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे वार्ताहर, १० मे.

योगाची संगत सोडू नका” हा संदेश दिला तळेगाव दाभाडे चे सुपुत्र माधव सदाशिव कुलकर्णी यांनी. ते उत्तम सायकल पटु व पुणे रनिंग क्लब चे कार्यशील सदस्य आहेत. आपला ७५ वा वाढदिवस त्यांनी ७५ कि. मी. सायकल प्रवास करुन साजरा केला. त्यांचे सोबत दिपक महाडिक व सौ.भारती हे योगा ट्रेनरही या वर्धापनदिन सोहळ्यात उपस्थित होते.
कलापिनी स्वास्थ्ययोगाचे १९ वर्ष ज्येष्ठांसाठी अविरत चाललेले कार्य पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
दुसरे पाहुणे होते रविंद्र टोळे कलापिनी चे फाउंडर मेंबर. त्यांनी व माधव कुलकर्णी यांनी तळेगावी “कथा कुणाची व्यथा कुणा” या नाटकात एकत्र काम केले होते. कै. डॉ. शं. वा. परांजपे यांचे बरोबर ते हौशी नाट्य मंडळात कार्यरत होते.

विषेश म्हणजे त्यांचा ८० वा वाढदिवस व लग्नाचा ५० वा वाढदिवस आणि अशोक बकरे, कलापिनी स्वास्थ्ययोग प्रमुख यांचा ६९ वा वाढदिवस असा त्रिवेणी योग जुळून आला. त्या दोघांचाही उपरणे व पुष्पगुच्छ देऊन कुटुंबासह सत्कार करणेत आला.कार्यक्रमाचे सुरवातीला उषा धारणे यांनी स्वागत गीत व ईशत्सवन गायले.मान्यवरांचे हस्ते नटराज पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या सोहळ्याला तळेगावातील सर्व हास्यसंघ उपस्थित होते.रविंद्रनाथ पांढरे यांनी अहवाल वाचन केले. कलापिनी स्वास्थ्ययोगींनी राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवत विविध राज्यांतील वेशभूषा करून “झननन झननन रेलगाडी” या गीतांवर नृत्य केले. भारतमाता उद्यान, वतननगर हास्यसंघाचे मोरेश्वर होनप व सहका-यांनी हास्याचे अभंग गात चाललेली दिंडी सादर केली. तर कलापिनी स्वास्थ्ययोगाने “जीवन सुंदर गाणे” या गाण्यावर विविध व्यायाम प्रकार एकत्र गुंफून ताल धरला. याशिवाय रश्मी पांढरे, भारती शिंदे व वैशाली लिमये यांनी सं. शारदा नाटकातील “अवघे पाऊणशे वयोमान” या गीतांवर नृत्य नाटिका सादर केली.

रेखा रेंभोटकर व महादेवी ढब्बू यांनी नृत्यासाठी गाणी गायली. ध्वनी संयोजन शार्दुल गद्रे व प्रणव केसकर यांनी केले तर सूत्रसंचालन संपदा नातू यांनी केले. टोळे काकांनी डॉक्टरांबरोबरच्या जुन्या आठवणी शेअर केल्या. अशोक सोनाळकर, व डॉ.अनंत परांजपे यांनी वाढदिवस उत्सवमूर्तींचे कौतुक केले. होनप काकांनी रामरक्षा कवच सादर करून शुभेच्छा दिल्या.

कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांनी एकटेपणा दूर करणारा, तणावांवर मात करणारा, मनाबरोबर शरिराचे आरोग्य उत्तम ठेवणारा हा हास्ययोग किती महत्त्वाचे योगदान करत आहे हे सांगितले.स्वास्थ्ययोगी महिलांनी सर्व मान्यवरांचे औक्षण करून “सु्दिनम् सु्दिनम् जन्मदिनम तव” गात हसत हसत केक कापण्याचे हास्य प्रात्यक्षिक केले. विवेकानंद योगा, लायन्स क्लब चे डाॅ. शाळीग्राम भंडारी यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन उत्सवमूर्तींचे अभिष्टचिंतन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रविंद्र पांढरे पतीपत्नी, किसन शिंदे पतीपत्नी, पांडुरंग देशमुख पतीपत्नी, भारती शहा, भारती गुजर,कोटफोडे, वंदना सोनवणे, संगिता यादव, दीपक जयवंत, सुरेश भोईर व सर्व हास्य योगींनी सहकार्य केले.

आभार प्रदर्शनानंतर चविष्ट अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!