आपला जिल्हाकृषीवार्तामहाराष्ट्र

पुसाणे सौरउर्जा प्रकल्प जागतिक दर्जाचा..

सीएसआर निधीचा योग्य वापर व्हावा........ किशोर आवारे.

Spread the love

पुसाणे सौरउर्जा प्रकल्प जागतिक दर्जाचा.. सीएसआर निधीचा योग्य वापर व्हावा……..
किशोर आवारे.Pusane sonkragaanleg is wêreldklas.. MVO-fondse moet reg aangewend word……..Jeugperseel.

आवाज न्यूज मावळ प्रतिनिधी,११मे.

पुसाणे येथील सौर ऊर्जा प्रकल्प हा जागतिक दर्जाचा प्रकल्प असून सीएसआर फंडाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे कार्य मावळ तालुक्यात केल्याचे समाधान किशोर आवारे यांनी व्यक्त केले. सी एस आर फंड राजकीय फायद्यासाठी न वापरता सामाजिक हित जोपासण्यासाठी वापरला जावा असेही आवरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

मावळ तालुक्यातील पुसाणे गावाला सौरउर्जा वापरणारे देशातील पहिले गाव म्हणून मान मिळाला आहे, या गावामध्ये भव्यदिव्य असा सोलर सिस्टीम प्रकल्प कार्यान्वित होवून त्याचा लोकार्पन सोहळा नुकताच संपन्न झाला. त्यामुळे पुसाणे गावाची विजेची समस्या पुर्णपणे सुटणार आहे. या प्रकल्पासाठी २ कोटी ६० लाख रूपये खर्च आला.
तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे, गावचे सरपंच संजय आवंढे यांच्या प्रयत्नातून व एमटीयू इंडिया कंपनीच्या माध्यमातून गावामध्ये सोलर | सिस्टीम प्रकल्प उभारण्यात आला. त्याचा लोकार्पन सोहळा कंपनीच्या जर्मनी येथील मनुष्यबळ विभागाच्या प्रमुख मिशेल लिऊ,टोबियास ऑस्टरमेलर, जिओव्हानी स्पाडारो, भारतातील व्यवस्थापकीय संचालक जी एस सेल्विन यांच्या उपस्थितीत पार पडला.ग्रामस्थांच्यावतीने परदेशी पाहुण्यांची यावेळी ढोल ताशाच्या गजरात सजविलेल्या बैलगाडीतून मिरवणुक काढण्यात आली. ग्रामस्थांच्या स्वागताने परदेशी पाहुणे भारावले.याप्रकल्पापासून रोजची चाळीस किलोवॅट विजनिर्मिती होणार असून त्यामुळे गावातील रस्त्यावरील लाईट, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, मंदीरे, गावाला पाणीपुरवठा करणा-या उपसा योजनेच्या मोटारींसाठी २४ तास विजपुरवठा होणार आहे.

 

भविष्यात संपुर्ण गावातील कुटुंबां सुध्दा वीज पुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार आहे. दिड हजार लोकसंख्या असलेल्या या गावाने सोलर सिस्टीम यंत्रणा उभी करण्यासाठी २० लाख रुपये खर्च केले तर एमटीयू कंपनीने यासाठी २ कोटी ४० लाख रुपये खर्च केले आहेत.
यामध्ये केवळ सोलर सिस्टीमच नाही तर बॅटरी बॅकअप, आणि जनरेटर बॅकअप देखील या सोलर सिस्टीम प्रकल्पाला देण्यात आला असल्याने पावसाळ्याच्या दिवसात सुध्दा विजपुरवठा सुरळीत राहणार असल्याने विजे अभावी पाण्यासाठी होणारी महिलांची वणवण थांबणार असून तसेच विद्यार्थी सुध्दा अभ्यासापासुन वंचित राहणार नसल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रकल्पासाठी माजी सरपंच धनाजी वाजे, पोपट वाजे, शशिकांत वाजे, गोरख रावडे व पुसाणे ग्रामस्थांचे योगदान लाभले.

सिंगापुर, इटली व जर्मणी येथुन आलेल्या पाहुण्यांनी सांगितले कि आम्ही पहिल्यांदाच अश्या प्रकारची मदत केली असुन याचा आम्हाला खुप आनंद होत आहे. भविष्यात या प्रोजेक्टचा वापर व्यवस्थित झाल्यास गावातही वीज पुरवठा सर्वांना करता येईल याबाबत विचार करता येईल असे सांगितले. गावचे सरपंच संजय आवंढे म्हणाले गावाने २० लाख रूपये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मदत केली. गावाचा विकास हाच सर्वांचा विकास ठरणार असल्याने हा प्रकल्प गावासाठी महत्वाचा ठरणार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!